Sputnik V या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उत्पादनासाठी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी सीरमनं भारतात या लसीच्या उत्पादनासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. दरम्यान सरकारनं आता त्यांना परवानगी दिली असून काही अटी शर्थींसह पुण्यातील हडपसर येथील प्रकल्पात या लसीचं उत्पादन केलं जाणार आहे. या लसीच्या उत्पादनासाठी सीरमनं रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसह करार केला आहे. औषध नियामक मंडळ डीजीसीएनं सीरम इन्स्टीट्यूटला भारतात स्पुटनिकच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. यापूर्वी सीरमनं स्पुटनिक व्ही च्या लसीच्या उत्पादनासाठी अर्ज केला होता. त्यांनी तपास, चाचणी आणि अॅनालिसिस्ट करण्याची परवानगी मागितली होती. पुण्यात मुख्यालय असलेली सीरम सध्याच्या घडीला कोविशील्ड लसींचं उत्पादन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं यासाठीचं संशोधन केलं असून निर्मितीची जबाबदारी सीरमकडे आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देत असताना सीरमनं आता स्पुटनिकच्या निर्मितीसाठीदेखील अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून करण्यात येत आहे.
Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 22:14 IST
Sputnik V : स्पुटनिक व्ही चं उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं मागितली होती परवानगी. सीरमनं केलाय रशियासोबत करार.
Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी
ठळक मुद्देस्पुटनिक व्ही चं उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं मागितली होती परवानगी. सीरमनं केलाय रशियासोबत करार.