डोवाल नव्हे, थंडी संपवेल भारत-चीनमधील तणाव
By Admin | Updated: July 16, 2017 16:40 IST2017-07-16T16:40:30+5:302017-07-16T16:40:30+5:30
गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले दोन्ही

डोवाल नव्हे, थंडी संपवेल भारत-चीनमधील तणाव
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - गेल्या महिनाभरापासून भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. डोकलाम परिसरात एकमेकांसमोर असलेले दोन्ही देशांचे लष्कर माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनचा दौरा करणार आहेत. मात्र या परिसरात जोपर्यंत कडाक्याची थंडी पडत नाही तोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव निवळणार नसल्याचे सुरक्षाविषयक तज्ज्ञांचे मत आहे. तसेच डोवाल यांच्या चीन दौऱ्यातही सीमेवरील तणावाबाबत औपचारिक चर्चा होण्याची शक्यताही तज्ज्ञांना कमीच वाटत आहे.
इन्स्टिट्युट ऑफ साऊथ अँड साऊथईस्ट एशियन अँड ओशन स्टडीजचे संचालक हू शिशेंग यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "जोपर्यंत भारतीय लष्कर डोकलाममधून माघार घेत नाही तोपर्यंत कोणत्याची प्रकारची चर्चा होणार नाही अशी चीनची भूमिका आहे. या परिस्थितीत चर्चा झाल्यास चीनमधील सर्वसामान्य जनतेची भावना भडकू शकतात."
अधिक वाचा
(डोकलाम प्रकरण - अजित डोवाल जाणार चीनला)
(डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा)
(डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ? )
"कुठलाही देश माघार घेऊन स्वत:ला पराभूत म्हणून दाखवून देण्यास इच्छूक नसल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे. दोन्ही देश एकमेकांसमोर बसून चर्चा करण्याची शक्यता कमीच आहे. मात्र येथील हवामान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत वाद सुरूच राहण्याची शक्यता आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडी पडत असल्याने त्यावेळी येथे राहणे अशक्य होईल. त्यानंतर दोन्ही सैन्यदले मागे हटू शकतात. मात्र त्यानंतरही हा तणाव संपण्याची शक्यता कमीच आहे.

दरम्यान, अजित डोवाल या महिन्याच्या अखेरीस ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी चीनमध्ये जाणार आहेत. डोवाल यांच्या त्या दौऱ्यादरम्यान चीनला चर्चेसाठी तयार करणे कठीण असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न चीनी अधिकाऱ्यांकडून होण्याच्या शक्यता आहे.