वेळा अमावस्येवर दुष्काळाचे सावट ! शिवारं माळरानासारखी : पांडवाच्या कोपीसाठी कडब्याच्या पेंड्याही विकत घेण्याची पाळी
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:52+5:302014-12-20T22:27:52+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव आदी मोठे प्रकल्प असल्याने शिरूर अनंतपाळची सिंचनाचा तालुका म्हणून ओळख आहे़ पण, यंदा केवळ ३५० मि़मी़ इतका पाऊस झाल्याने सरासरीही ओलांडली नाही़ त्यामुळे खरीप हातचे गेले तर हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येत आहे़ पावसाअभावी रबीचे साडेअकरा हजार हेक्टर क्षेत्रा कोरडेच राहिले आहे़ त्यामुळे रबीतील गहू, हरभरा, जोंधळा, करडई, सूर्यफूल अशी पिके कोठेही दिसून येत नाहीत़

वेळा अमावस्येवर दुष्काळाचे सावट ! शिवारं माळरानासारखी : पांडवाच्या कोपीसाठी कडब्याच्या पेंड्याही विकत घेण्याची पाळी
श रूर अनंतपाळ : तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव आदी मोठे प्रकल्प असल्याने शिरूर अनंतपाळची सिंचनाचा तालुका म्हणून ओळख आहे़ पण, यंदा केवळ ३५० मि़मी़ इतका पाऊस झाल्याने सरासरीही ओलांडली नाही़ त्यामुळे खरीप हातचे गेले तर हिवाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येत आहे़ पावसाअभावी रबीचे साडेअकरा हजार हेक्टर क्षेत्रा कोरडेच राहिले आहे़ त्यामुळे रबीतील गहू, हरभरा, जोंधळा, करडई, सूर्यफूल अशी पिके कोठेही दिसून येत नाहीत़ वेळा अमावस्येला शेतातील हिरव्यागार पिकांची पूजा केली जाते़ आकर्षक कोप उभारून कापीची सजावटसुद्धा केली जाते़ परंतु, यावर्षी वेळा अमावस्येपूर्वीच उन्हाळयासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेत शिवार ओसाड पडली आहेत़ माळराने करड झाली आहेत़ त्यामुळे वेळा अमावस्येवर दुष्काळी सावट दिसून येत आहे़ तसेच हा सण दिवसभर शेतावर जाऊन साजरा करायचा असतो़ यासाठी शहरवासीयही गावाकडे येतात़ शेतात जाऊन भज्जी, रोडगा, अंबिल, खिचडा याचा आनंद घेतात़ परंतु, शिवारात पाणीच नसल्याने घरातून पाणी घेऊन जावे लागणार आहे़