रिमझिम पाऊस...
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
शेजारच्या राज्यात जोरदार पावसाचा इशारा : उपराजधानीत १७.३ मि.मी. पावसाची नोंद

रिमझिम पाऊस...
श जारच्या राज्यात जोरदार पावसाचा इशारा : उपराजधानीत १७.३ मि.मी. पावसाची नोंद नागपूर : हिंदी महिन्यानुसार श्रावणाला सुरुवात झाली असून, या महिन्यातील पहिल्याच सोमवारी रिमझिम पावसाने उपराजधानीत हजेरी लावली. सोमवारी सकाळपासून आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. यानंतर दिवसभर पावसाची रिमझिम सुरू राहिली. त्यानुसार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत नागपुरात १७.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दुसरीकडे या रिमझिम पावसामुळे कमाल व किमान तापमानात केवळ २ डिग्रीचे अंतर राहिले आहे. हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्वोत्तर राज्यांमध्ये धुंवाधार पाऊस कोसळत आहे. गुजरात व राजस्थानमध्ये पावसाने कहर माजविला आहे. शिवाय आता झारखंड व छत्तीसगड राज्यातही मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दुसरीकडे विदर्भात मागील संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. त्यामुळे १ जून ते ३ ऑगस्टपर्यंत केवळ ३९३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ती सरासरी पावसापेक्षा २४ टक्के कमी आहे. साधारण या काळात ५१५.७ मि.मी. पाऊस पडतो. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये फारच चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत मराठवाड्यात केवळ १४८.८ मि.मी. व मध्य महाराष्ट्रात २९४.१ मि.मी. पाऊस पडला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात रिमझिम पाऊस होऊ शकतो. मात्र मुसळधार पावसाची कुठेही शक्यता दिसून येत नाही. त्याच वेळी शेजारच्या मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मात्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ......