मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पसार

By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:54+5:302014-12-19T22:56:54+5:30

नागपूर : मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पळून गेला. गुरुवारी पहाटे रामदासपेठेत ही घटना घडली. सुप्रीम रामभाऊ जुनघरे (वय २४) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. तो बोरगाव, सौंसर (छिंदवाडा) येथील रहिवासी आहे.

Driving license with the owner's luxury car | मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पसार

मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पसार

गपूर : मालकाची लक्झरी कार घेऊन वाहनचालक पळून गेला. गुरुवारी पहाटे रामदासपेठेत ही घटना घडली. सुप्रीम रामभाऊ जुनघरे (वय २४) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. तो बोरगाव, सौंसर (छिंदवाडा) येथील रहिवासी आहे.
रामदासपेठेतील आर्किटेक्ट महावीर जैन यांच्याकडे कारचालक म्हणून जुनघरे काम करीत होता. भद्रावती येथील सुप्रसिध्द जैन मंदिरात बुधवारी धार्मिक कार्यक्रम होता. त्यामुळे जैन आपल्या मित्रांसोबत तेथे गेले होते. त्यांना भद्रावतीला सोडून आरोपी जुनघरे कार घेऊन नागपुरात परतला. जैन यांच्या निवासस्थानी पार्किंगमध्ये कार ठेवून त्याने जैन यांच्या परिवारातील सदस्यांना कारची चावी दिली. रात्री तो पार्किंगमधील रेस्टरूममध्ये झोपला. सकाळी ५ वाजता त्याने चौकीदाराला मालकांनी बोलविल्याचे सांगून प्रवेशद्वार उघडण्यास बाध्य केले. बनावट चावीने कार सुरू करून जुनघरे पळून गेला.
उशिरा रात्री धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर जैन यांनी जुनघरेला कार घेऊन बोलविण्यासाठी संपर्क केला. त्याचा मोबाईल सारखा बंद असल्याचे पाहून ते नागपूरकडे निघाले. सकाळी ९ वाजता ते येथे पोहचले. त्यांना आपली वर्ना कार (एमएच ३१/ डीव्ही ०६३०) दिसली नाही. त्यांनी विचारपूस केली असता जुनघरे सकाळी ५ वाजता कार घेऊन गेल्याचे अपार्टमेंटच्या चौकीदाराने सांगितले. त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे जैन यांनी त्याच्या छिंदवाडा येथील नातेवाईकांकडे संपर्क साधला. जुनघरे वाईट वृत्तीचा असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे जैन यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
--
बॉक्स
शहानिशा करूनच ठेवले कामावर
जुनघरे दीड वर्षांपासून ट्रान्सपोर्टर परेश वेद यांच्याकडे काम करायचा. काही दिवसांपूर्वीच तो महावीर जैन यांच्याकडे कामाला आला. आवश्यक ती सर्व कागदपत्रे जवळ ठेवून, शहानिशा करूनच जैन यांनी जुनघरेला कामावर ठेवले. तरीसुद्धा त्याने धोकेबाजी केली. त्याने अशाचप्रकारे यापूर्वीही गुन्हे केले असावे, असा संशय आहे. सीताबर्डी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---

Web Title: Driving license with the owner's luxury car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.