शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

जुनं ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास लवकर करा हे काम, बदलला नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 6:55 PM

आता पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स(डीएल) आणि वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता एकसारखंच मिळणार आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) तयार करण्याचे नियम आणखी सोपे केले आहेत. आता पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स(डीएल) आणि वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता एकसारखंच मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक राज्यात डीएल आणि आरसी बुकचा रंग एकसमानच असणार आहे आणि त्यातील माहितीही जवळपास सारखीच राहणार आहे. देशभरात दररोज 32 हजार डीएल दिले जातात किंवा त्यांचं नूतनीकरण करण्यात येते. अशा प्रकारे जवळपास दररोज 43 हजार गाड्यांची नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली जाते. या नव्या डीएल किंवा आरसीमध्ये फक्त 15 ते 20 रुपयांचा खर्च आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या बदललेल्या नियमामुळे ट्रॅफिकच्या कामातूनही आम्हाला वेळ मिळणार आहे. बदललं आपलं डीएल- या निर्णयामुळे डीएल आणि आरसीसंदर्भात कोणतीही संभ्रमाची परिस्थिती निर्माण होणार नाही. प्रत्येक राज्य स्वतःच्या सुविधेनुसार डीएल आणि आरसीचा नमुना तयार करतो. त्यामुळे काही राज्य याची माहिती डीएलच्या मुखपृष्ठावर देतात, तर काही जण मागच्या बाजूला माहिती देतात. परंतु आता सर्वच राज्यांमध्ये नव्या नियमानुसार डीएल किंवा आरसी तयार होणार आहे. 30 ऑक्टोबर 2018ला ड्राफ्ट नोटिफिकेशन पाठवून यासंदर्भात सर्वच पक्षांकडून मत मागवण्यात आलं होतं. सर्वच पक्षांकडून आलेल्या सूचनांनंतर सरकारनं हा नवा नियम अंमलात आणला आहे.

स्मार्ट झालं डीएल- या स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स डीएल आणि आरसीमध्ये मायक्रोचिप आणि क्यूआर कोड आहे. त्यामुळे कोणत्याही नियमांचं आपण उल्लंघन केल्यास ते लपून राहणार नाही. ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या डिव्हाइसमध्ये कार्ड टाकल्यानंतर क्यूआर कोड स्कॅन केल्यास गाडी आणि चालकासंदर्भातील सर्व माहिती मिळणार आहे. नोटिफिकेशननुसार सर्वच राज्यात 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाड्यांचं नोंदणी प्रमाणपत्र पीवीसीवर आधारित झालं असून, तुम्ही लवकरात लवकर तुमचं जुनं ड्रायव्हिंग लायसन्स बदलून घेण्याचं सुचविण्यात आलं आहे. 

टॅग्स :carकार