शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाने मारलेला शॉर्टकट घेऊन गेला मृत्यूच्या दारात! ४७ जणांचा बुडून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:48 IST

Accident : मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असून सर्व जण एका परीक्षेसाठी सतना येथे जात होते.अपघातग्रस्त बस सिधी येथून सतना येथे जात होती.

सिधी (मध्य प्रदेश) : प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिधी जिल्ह्यात रामपूर नैकीन पोलीस ठाण्याजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असून सर्व जण एका परीक्षेसाठी सतना येथे जात होते.अपघातग्रस्त बस सिधी येथून सतना येथे जात होती. बसमध्ये ५४ प्रवासी होते. त्यातील बहुसंख्या विद्यार्थी होते. ते ‘एएनएम’ची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. अपघात घडला त्या ठिकाणी कच्चा आणि अरुंद रस्ता आहे. तेथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कालव्यात काेसळली. मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे बसचालकाने हा शॉर्टकट घेतला. तोच त्यांना मृत्यूच्या दारी घेऊन गेला. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर राज्य सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

शिवरानीने दोघांना वाचविलेबस कालव्यात कोसळल्यानंतर काही स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापैकी शिवरानी नावाच्या मुलीने प्राणाची चिंता न करता कालव्यात उडी टाकून दोघांना सुखरूप बाहेर काढले. मुख्यमंत्री चौहान यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केले आहे. तिचा अभिमान असल्याचे ट्विट केले आहे. बस कालव्यात कोसळली त्यावेळी शिवरानी तिच्या भावासोबत जवळच उभी होती.

अमित शहा यांचे कार्यक्रम रद्दअपघातानंतर राज्य सरकारने सर्व महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेसंबंधीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश