शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नजर हटी दुर्घटना घटी; गार्डनमध्ये जोडप्यांना पाहताना बसवरील नियंत्रण सुटलं, 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 18:08 IST

जखमींमधील तिघांची प्रकृती गंभीर

कोलकाता : पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये एका बसनं व्हॅनला दिलेल्या धडकेत 10 जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. चालक रस्त्याशेजारील बागेतील जोडप्यांना पाहण्यात मग्न असल्यानं त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे हा अपघात झाला. घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि मिनी बसमधून प्रवास करणाऱ्या सुकुनार अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस दुर्गापूरहून सिटी सेंटरच्या दिशेनं जात होती. 'बस त्रोयका पार्क परिसरातून जात असताना चालकाचं लक्ष बागेत असलेल्या जोडप्यांकडे गेलं. चालक जोडप्यांकडेच पाहत राहिल्यानं त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी समोरुन येणारी पिकअप व्हॅन त्याला दिसली नाही आणि बसनं व्हॅनला जोरदार धडक दिली,' असं अधिकारी यांनी सांगितलं. या अपघातात पिकअप व्हॅनचा चालक मोहम्मद अशरफ गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 'मी सतत हॉर्न वाजवत होतो. मात्र बस चालकाचं लक्षच नव्हतं. मी धडक टाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र त्यात मला अपयश आलं,' असं मोहम्मदनं सांगितलं. अपघातानंतर बस चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.  

टॅग्स :Accidentअपघात