जायंटस् ग्रुपतर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी भेट

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30

सोलापूर : जायंटस् ग्रुप ऑफ सोलापूरच्या वतीने दहिटणे येथील समाधान मराठी विद्यालयाला पिण्याच्या पाण्याची टाकी भेट देण्यात आली.

Drinking water tank by Giants Group | जायंटस् ग्रुपतर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी भेट

जायंटस् ग्रुपतर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी भेट

लापूर : जायंटस् ग्रुप ऑफ सोलापूरच्या वतीने दहिटणे येथील समाधान मराठी विद्यालयाला पिण्याच्या पाण्याची टाकी भेट देण्यात आली.
यावेळी जायंटस्चे सोशल कमिटी मेंबर डी. एम. येमूल, माजी प्रेसिडेंट भगवानराव कोंडले, अरविंद कोंडा, प्रेसिडेंट वासुदेव दोरनाल, अनिल व्हनमाने, नगरसेवक मेघनाथ येमूल, हरीश कोंडा, रमेश गोसकी, सचिव मनोहर कोडम, नागनाथ कोंडा, मोहन क?ा, अंबादास कनकी, संजू नादरगी, प्रमोद बोनाकृती, शाळेतील शिक्षक कामशे?ी, पठाण, शौकत शेख, हसीना शेख आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक आय. एस. शेख यांनी प्रास्ताविक केले. डी. एम. येमूल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नगरसेवक येमूल यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेचे मॅडम यांनी केले. (प्रतिनिधी)
फोटो ओळी
जायंटस् ग्रुप ऑफ सोलापूरच्या वतीने समाधान मराठी विद्यालयाला पाण्याची टाकी भेट देण्यात आली. यावेळी बोलताना नगरसेवक मेघनाथ येमूल व पदाधिकारी.

गणित प्रज्ञा परीक्षेत कामतकर अँकॅडमीचे यश
सोलापूर : महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रज्ञा परीक्षेत कामतकर अँकॅडमीमधील ओम पाटील, केदार ढेपे, देवांश ठक्कर यांना स्कॉलरशीप, मेडल व प्रमाणपत्र तसेच देवाशिष कहाते, आभा लहुरीकर यांना प्रमाणपत्र मिळाले. या विद्यार्थ्यांना सुखदा कामतकर व सुनील कामतकर यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
फोटो ओळी
गणित प्रज्ञा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसमवेत सुखदा कामतकर व सुनील कामतकर.

प्रांतपाल कोणशिरसगी यांचा सत्कार
सोलापूर : गोवा, मडगाव येथे लायन्स क्लब 313 डीच्या प्रांतिक अधिवेशनात द्वितीय प्रांतपालपदी अरविंद कोणशिरसगी यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीच्या वतीने फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. र्शीकांत येळेगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उल्हास पाटील, अरुण तापडिया, गौतम ओसवाल, सुगत गायकवाड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
फोटो ओळी
अरविंद कोणशिरसगी यांची लायन्सच्या द्वितीय प्रांतपालपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी रमणलाल सोनिमिंडे, उल्हास पाटील, अरुण तापडिया, गौतम ओसवाल, सुगत गायकवाड, गिरीश कोनापुरे आदी.

Web Title: Drinking water tank by Giants Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.