शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

क्षणार्धात उडणार शत्रूच्या चिंधड्या, डीआरडीओने केली विध्वंसक अस्त्राची यशस्वी चाचणी

By बाळकृष्ण परब | Updated: September 23, 2020 15:38 IST

लडाखमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे डीआरडीओने एमबीटी अर्जून रणगाड्यावरून लेझर गाइडेड क्षेपणास्त्राची (एटीजीएम) यशस्वी चाचणी केलीहे क्षेपणास्त्र तीन किलोमीटरपर्यंत असलेल्या लक्ष्याला यशस्वीरीत्या भेदू शकते हे क्षेपणास्त्र विविध प्लॅटफॉर्मवरून लॉन्च क्षमतेसह विकसित करण्यात आले आहे

नवी दिल्ली - लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून शस्त्रसज्जतेसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओला) मोठं यश मिळालं आहे. डीआरडीओने एमबीटी अर्जून रणगाड्यावरून लेझर गाइडेड क्षेपणास्त्राची (एटीजीएम) यशस्वी चाचणी केली आहे.अहमदनगरमधील केके रेंजमध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या चाचणीबाबत डीआरडीओने सांगितले की, या यशस्वी चाचणीमधून हे क्षेपणास्त्र तीन किलोमीटरपर्यंत असलेल्या लक्ष्याला यशस्वीरीत्या भेदू शकते हे सिद्ध  झाले. तसेच हे क्षेपणास्त्र विविध प्लॅटफॉर्मवरून लॉन्च क्षमतेसह विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एमबीटी अर्जुनच्या एका बंदुकीमधून तांत्रिक मूल्यांकनामधून जात आहे.

या लेझर गाइडेड क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अहमदनगरमधील केके रेंज (एसीसी अँड एस) येथे एमबीटी अर्जुनमधून लेझर गाइडेड अँटी टँक गाइडेड क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन. भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करत असेल्या डीआरडीओचा देशाला अभिमान आहे. 

 DRDO ने गेल्या आठवड्यात हाइपरसोनिक मिसाईलची केली होती चाचणी 

भारताने हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौछा असा देश बनला आहे ज्याच्याकडे स्वत:चे हाइपरसोनिक तंत्रज्ञान आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) ने गेल्या आठवड्यात ओडिशाच्या बालासोरमध्ये हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल HSTDV टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. हे क्षेपणास्त्र हवेत आवाजाच्या ६ पट वेगाने अंतर कापते. म्हणजेच दुष्मनाच्या एअर डिफेन्स सिस्टिमला या क्षेपणास्त्रा चा मागमूसही लागणार नाही.  

इतर महत्त्वाच्या बातम्याश्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे  

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागDRDOडीआरडीओIndiaभारतIndian Armyभारतीय जवान