दरकपातीचा चेंडू बँकांच्या कोर्टात!
By Admin | Updated: February 4, 2015 03:08 IST2015-02-04T03:08:10+5:302015-02-04T03:08:10+5:30
चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पतधोरणात व्याजदरात कोणतीही कपात न करता भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला सावध पवित्रा कायम ठेवला आहे.

दरकपातीचा चेंडू बँकांच्या कोर्टात!
मुंबई : आर्थिक परिस्थितीत सुधार दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सादर झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या पतधोरणात व्याजदरात कोणतीही कपात न करता भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला सावध पवित्रा कायम ठेवला आहे. मात्र, एसएलआर (स्टॅट्युटरी लिक्विडीटी रेशो)च्या दरात अर्धा टक्क्याची कपात केल्याने बँकांकडे सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता बँका स्वत:च्या पातळीवर व्याजदरात कपात करून ग्राहकांना दिलासा देतील का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.