शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

Draupadi Murmu Oath Ceremony : पंतप्रधानांना राष्ट्रपती शपथ देतात, पण राष्ट्रपतींना शपथ कोण देतं माहितेय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 10:21 IST

खरे तर, देशाच्या पंतप्रधानांना राष्ट्रपती शपथ देत असतात, मग राष्ट्रपतींना शपथ कोण देतं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर जाणून घ्या...

देशाच्या पंधराव्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती पदाची शपथ घेत आहेत. त्या थोड्याच वेळात या पदाची शपथ घेतील. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. खरे तर, देशाच्या पंतप्रधानांना राष्ट्रपती शपथ देत असतात, मग राष्ट्रपतींना शपथ कोण देतं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देत असता. 

मात्र, जर देशाचे मुख्य न्यायाधीश अथवा सरन्यायाधीश अनुपस्थितीत असतील, तर अशावेळी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती हे राष्ट्रपती पदाची शपथ देऊ शकतात. राज्यघटनेच्या कलम 60 मध्ये राष्ट्रपतींना शपथ देण्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे. राष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ देतील. यावेळी 21 तोफांची सलामीही देण्यात येईल. शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती देशाला उद्देशून भाषणही करणार आहेत. द्रौपदी मुर्मू या देशच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. या समारंभात मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, मंत्रिपरिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, संसद सदस्य तथा सरकारमधील काही मुख्य सैन्याबाहेरील तथा सैन्यातील अधिकारीही उपस्थित असतील.  संसदेच्या केंद्रीय कक्षात पार पडणाऱ्या या समारंभानंतर, राष्ट्रपती मुर्मू या ‘राष्ट्रपति भवना’कडे रवाना होतील. तेथे त्यांना एक ‘इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर’ दिलाजाईल आणि मावळत्या राष्ट्रपतींना निरोप दिला जाईल.

राष्ट्रपतींचे अधिकार - भारताचे राष्ट्रपती देशाच्या राजकीय संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवतात, जेणेकरून त्या राज्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करू शकतील. देशाची राज्यघटना वाचली तर, दिसून येईल की असे काहीच नाही जे राष्ट्रपती करू शकत नाहीत. राष्ट्रपती हे भारताच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर आहेत. कलम ७२ अन्वये राष्ट्रपती एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीची शिक्षा माफ किंवा कमी करू शकतात. फाशीच्या शिक्षेवर निर्णय घेण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना आहे.

राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, राज्यपाल, निवडणूक आयुक्त आणि इतर देशांतील राजदूत यांची नियुक्ती करतात. कलम ३५२ अन्वये राष्ट्रपती युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या प्रसंगी देशात आणीबाणी घोषित करू शकतात.संसदेने मंजूर केलेले कोणतेही विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतरच कायदा बनते. राष्ट्रपतींची इच्छा असेल तर ते विधेयक काही काळ थांबवू शकतात. तसेच ते विधेयक फेरविचारासाठी संसदेकडे पाठवू शकतात. संसदेने ते विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्यावर स्वाक्षरी करावी लागेल.देशाचे सर्व कायदे आणि सरकारचे प्रमुख धोरणात्मक निर्णय राष्ट्रपतींच्या नावाने घेतले जातात. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती आपल्या अधिकारांचा वापर करतात. राष्ट्रपती मंत्रिपरिषदेला त्यांच्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यास सांगू शकतात. पण तिथेच, जर पुन्हा सल्ला आला तर तो त्याचे पालन करण्यास बांधील आहे.