शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

'मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय', सामानासह विमानतळावर पोहचलेल्या 'त्या' महिलेने घातला जोरदार गोंधळ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 11:39 IST

Rahul Gandhi News : विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली.

नवी दिल्ली -  काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे राहुल गांधींची चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या महिलेने मी राहुल गांधींशी लग्न करायला चालले आहे. मला दिल्लीला जाऊ द्या असं म्हणत विमानतळावर गोंधळ घातला आहे. विमानाचं कोणतंही तिकीट नसताना महिलेला विमानतळावर प्रवेश करायचा होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला. तिकीट नसतानाही ही महिला बरंच सामान घेऊन विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा यासाठी सुरक्षारक्षकांसोबत वाद घालत होती. सुरक्षारक्षकांनी तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जात आहे. मला त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सर्वजण मला सलाम कराल असंही ही देखील महिलेने सुरक्षारक्षकांना म्हटलं आहे. 

सुरक्षारक्षकांनी महिलेला बराच वेळ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने गोंधळ सुरूच ठेवला. अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता ती महिला परदेशीपूरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता चौकशीमध्ये ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली. गेल्या काही दिवसांपासून ही महिला आपल्या घरातून पळून जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. अनेकदा ही महिला घरातून पळून जाते आणि बाहेरच्या लोकांशी कोणत्याही कारणावरुन वाद घालत असल्याचं समोर आलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच इंदूर विमानतळावर अशाच प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला होता. एरोड्रम पोलीस आणि सीआयएसएफने हैदराबादवरुन आलेल्या एका प्रवासी मानसिक रुग्ण असल्याचे सांगत त्याला एमव्हायएच रुग्णालयामध्ये पाठवलं होतं. नंतर ही व्यक्ती फ्रॅब्रिकेशन व्यापारी असल्याचं समजलं. पोलिसांच्या वागण्यामुळे या व्यक्तीच्या नातेवाईकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. 40 वर्षीय रमेश हे 11 जानेवारी रोजी उज्जैन येथे देवदर्शनासाठी आले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"राहुल गांधींना सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये?", भाजपा नेत्याचा सवाल

राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानवरून भाजपाने त्यांना घेरल्याचं पाहायला मिळत आहे. हरियाणाचे मंत्री आणि भाजपा नेते अनिल विज (Anil Vij) राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या जवानांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राहुल गांधी यांना देशाच्या सीमेवर मायनस तापमानात का उभं करू नये? असा सवाल देखील अनिल विज यांनी केला आहे. विज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच राहुल गांधींवर निशाणा साधत टीका केली आहे. "राहुल गांधी सातत्याने देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करत आहेत. ते काही गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मायनस तापमानात का उभं करू नये?, देशाच्या शत्रूंचा सामना करण्यासाठी उभं राहिल्यावर एका दिवसात त्यांना सर्व गोष्टी समजतील" असं अनिल विज यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसAirportविमानतळ