शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनचं भारतीयांना 'सरप्राइज'! चीननं तिबेटसंदर्भात घेतला मोठा निर्णय, जूनपासून होणार लोगू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 14:30 IST

दरम्यान या पार्श्वभूमीर, पिथौरागडचे जिल्हाधिकारी आशीष भटगांई यांनी संबंधित विभागांना सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बीएसएनएलला सीमा क्षेत्रात नेटवर्क आणि संचार व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे.

चीननेभारतीय व्यापाऱ्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. आपल्या अधिपत्याखालील तिबेट भागातील तकलाकोट येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, चीननेभारतीय व्यापाऱ्यांसाठी पक्की दुकाने तयार केली आहेत. यामुळे, आता भारतीय व्यापाऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच अशा पक्क्या आणि सुसज्ज दुकानांमध्ये बसून व्यापार करण्याची संधी मिळेल. सीमावर्ती भागातील स्थानिक व्यापाऱ्यांना चीनच्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.

यासंदर्भात पिथौरागड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार, जून महिन्यापासून भारतीय व्यापाऱ्यांना ही दुकाने दिली जाण्याची शक्यता आहे. पिथौरागड जिल्हा मुख्यालयापासून ३०० किमी अंतरावर असलेल्या या सीमावर्ती भागात अनेक वर्षांपासून व्यापार चालत आला आहे. मात्र आता तेथील सुविधांमध्ये मोठी सुधारणा करण्यात येत आहे.

यासंदर्भात बोलताना भारत-चीन व्यापार समितीचे महासचिव दौलत रायपा म्हणाले, २०१९ पर्यंत जेव्हा व्यापार सुरू होता, तेव्हा भारतीय व्यापाऱ्यांसाठी येथे पक्की दुकाने नव्हती. ते नेपाळी व्यापाऱ्यांच्या सोबतीने तात्पुरत्या स्वरूपाच्या दुकानांद्वारे व्यापार करत असत. मात्र, आता तकलाकोटमध्ये सर्व व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र पक्की दुकाने उभारली जात आहेत.

जिल्हा प्रशासनही तयार - दरम्यान या पार्श्वभूमीर, पिथौरागडचे जिल्हाधिकारी आशीष भटगांई यांनी संबंधित विभागांना सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. बीएसएनएलला सीमा क्षेत्रात नेटवर्क आणि संचार व्यवस्था मजबूत करण्यास सांगण्यात आले आहे. गुंजी येथे शौचालये आणि पर्यटन सुविधा विकसित करण्यासाठी जिल्हा पंचायत आणि पर्यटन विभाग सक्रिय झाले आहेत. पूर्वीप्रमाणेच व्यापार सुरळीत करण्यावर प्रशासनाचा मुख्य भर आहे.

तकलाकोटचे महत्त्व -लिपुलेख खिंडीजवळील तकलाकोट हे उत्तराखंडसाठी एक प्रमुख व्यापारी केंद्र आहे. येथे प्रामुख्याने उनी कपडे, मीठ, तूप यांसारख्या वस्तूंचा व्यापार चालतो. चीनच्या या नवीन उपक्रमामुळे सीमा व्यापाराला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. कोरोना काळापासून तकलाकोटमध्ये भारत आणि चीनमधील व्यापार बंद होता. शेवटचा व्यापार २०१९ मध्ये झाला होता. आता तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा व्यापार सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : China's Surprise: New Trade Infrastructure for Indian Traders in Tibet

Web Summary : China is providing Indian traders with permanent shops in Tibet's Taklakot to boost cross-border commerce. Expected to start in June, this initiative, after a six-year halt, aims to revitalize trade of goods like wool and salt, strengthening the local economy.
टॅग्स :chinaचीनIndiaभारतbusinessव्यवसाय