भोरसाठी १५ कोटी १२ लाखांचा आराखडा

By Admin | Updated: March 25, 2015 21:09 IST2015-03-25T21:09:58+5:302015-03-25T21:09:58+5:30

जिल्हाधिकारी : वेळू गावात केली पाहणी

A draft of Rs.15 crores 12 lakhs for the dawn | भोरसाठी १५ कोटी १२ लाखांचा आराखडा

भोरसाठी १५ कोटी १२ लाखांचा आराखडा

ल्हाधिकारी : वेळू गावात केली पाहणी
भोर : तालुक्यासाठी सुमारे १५ कोटी १२ लाख रुपयांचा आराखडा तयार करून त्याला मान्यता दिली आहे . लोकसहभागातून ५० टक्के कामे करण्यात येत असून, भविष्यात जलयुक्त शिवार योजनेचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले.
वेळू (ता.भोर) गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागातून सुमारे ३ लाख रुपयांचे नाला खोलीकरणाचे काम सुरू आहे. त्याची पाहणी जिल्हाधिकारी सौरव राव यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार राम चोबे, गटविकास अधिकारी संजीव गायकवाड, कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, माजी उपसभापती अमोल पांगारे व ग्रामस्थ उपस्थित होते.
भोर तालुक्यात छोटे पाटबंधारे विभागाची ७, वनविभाग १३, कृषी विभाग १९, लोकसहभाग १२, व इतर एक, अशी ५३ कामे सुरू असून, लोकांचा सहभाग वाढत असल्याने दिवसेंदिवस या योजनेला गती मिळत असल्याचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले व तहसीलदार राम चोबे यांनी सांगितले.
चौकट
या योजनेत तालुक्यातील शिंदेवाडी, वेळू, ससेवाडी, कांबरे, करंदी, पसुरे, भोंगवली, पेंजळवाडी, वागजवाडी, मोरवाडी, महुडे बुद्रुक, गृहिणी या १२ गावांचा समावेश केला आहे. पाच पाच गावांसाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व गावातील नागरिक एकत्रित काम करीत आहेत.
फोटो : वेळू येथील नाला खोलीकरणाच्या कामाची पाहणी करताना जिल्हाधिकारी सौरव राव व इतर.

Web Title: A draft of Rs.15 crores 12 lakhs for the dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.