वडगाव झांजे मारहाणप्रकरणी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा
By Admin | Updated: February 5, 2015 22:32 IST2015-02-05T22:32:14+5:302015-02-05T22:32:14+5:30
पुणे : वडगाव झांजे (ता. वेल्हे) येथील गट नं. ३०८ मधील जमीन द्यावी याप्रकरणी आरोपींनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवाजी राघू झांजे (वय ४५, रा. वडगाव झांजे) यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३९५, ४२७ कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वडगाव झांजे मारहाणप्रकरणी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा
प णे : वडगाव झांजे (ता. वेल्हे) येथील गट नं. ३०८ मधील जमीन द्यावी याप्रकरणी आरोपींनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवाजी राघू झांजे (वय ४५, रा. वडगाव झांजे) यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३९५, ४२७ कलमान्वये दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी, की फिर्यादीचा चुलतभाऊ बाबाजी सोपान झांजे याला वडगाव झांजे येथील गट क्र. ३०८ मधील जमीन द्यावी, या कारणावरून आरोपी राहुल बाळू चोरघे, करण चोरघे, रोहिदास चोरघे, सोपान चोरघे, कांता पुणेकर व इतर अनोळखी तीन-चार व्यक्तींनी फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीला व त्याची पत्नी व आई यांना लाथा-बुक्क्याने मारहाण केली. दमदाटी, शिवीगाळ करून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन (अंदाजे ५००० रुपये रकमेची) चोरी करून घरावरील सिमेंटचे पत्रे दगडाने फोडले आहेत, अशी फिर्याद फिर्यादीने दिली आहे. याबाबत वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी फरार असल्याची माहिती वेल्ाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. याबाबत घुगे अधिक तपास करीत आहेत.