डॉ. आंबेडकरांचे स्मरण संयुक्त राष्ट्रांमध्येही
By Admin | Updated: April 15, 2017 01:13 IST2017-04-15T01:13:40+5:302017-04-15T01:13:40+5:30
सामाजिक न्याय आणि समतेसाठीच्या संघर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या उप सरचिटणीस अमिना मोहम्मद यांनी देशांना केले आहे.

डॉ. आंबेडकरांचे स्मरण संयुक्त राष्ट्रांमध्येही
संयुक्त राष्ट्रे : सामाजिक न्याय आणि समतेसाठीच्या संघर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या उप सरचिटणीस अमिना मोहम्मद यांनी देशांना केले आहे.
सामाजिक व आर्थिक सहभाग वाढवण्यासाठी देशांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही त्या म्हणाल्या. महिलाच नव्हे तर सगळ््या वंचित घटकांना सामावून घेत त्यांना सक्षम करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सामाजिक भेदभावाविरोधात डॉ. आंबेडकर यांच्या लढ्याचा सन्मान करणे योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारताच्या स्थायी मिशनने कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (वृत्तसंस्था)
आंबेडकर स्मृती वनम्
अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी येथील इनावोलू खेड्यात १०० कोटी रुपयांच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती वनम्ची पायाभरणी केली.