डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन

By admin | Published: January 9, 2017 01:36 AM2017-01-09T01:36:38+5:302017-01-09T01:36:38+5:30

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.

Dr. Rajendra Prasad taking half salary | डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन

डॉ. राजेंद्र प्रसाद घेत निम्मेच वेतन

Next

डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. १९५७ मध्ये त्यांची या पदावर फेरनिवड झाली. हे पद १२ वर्षे भूषविणारे ते एकमेव नेते आहेत. इतिहासातील सर्वात आदरणीय नेत्यांत त्यांचा समावेश होतो, असे म्हणणे गैर नाही. राजकीय वाद आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याच्या आजच्या काळात त्यांच्याकडून निश्चितपणे चांगला धडा घेऊ शकतो. ते आधी भारतीय आणि नंतर राजकारणी होते. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी वैयक्तिक कर्मचाऱ्यांचा ताफा कमी केला. त्यांच्याकडे केवळ एकच कर्मचारी होता. डॉ. प्रसाद सर्व कामे स्वत: करीत.
त्यांनी तीन वर्षे तुरुंगवास सोसला. या काळात कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा आपण तुरुंगात असल्यापेक्षा नातीच्या पायाला खरचटल्याची त्यांना अधिक काळजी वाटत होती. त्यांच्या एकाही नातवाला ते मोठे राजकीय नेते आहेत याची कल्पना नव्हती. त्यांच्या पत्नी राजवंशी देवी यांनी नातवांना ते तुमचे आजोबा आहेत एवढेच सांगितले होते. ते कुटुंबवत्सल होते. नातवे शाळेतून परतल्यानंतर ते त्यांच्यासोबत जेवण घेत.
 राष्ट्रपती म्हणून निम्मेच वेतन स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तेव्हा राष्ट्रपतींना दरमहा दहा हजार रुपये वेतन होते. राष्ट्रपती पदावर असल्यामुळे त्यांना अनेक भेटवस्तू देऊ केल्या जात; मात्र ते भेटवस्तू स्वीकारण्यास विनम्रपणे नकार देऊन त्या परत करीत. त्यांना भौतिक लाभात रस नव्हता.
तथापि, भारत भेटीवर आलेल्या विविध परदेशी गणमान्यांची स्वाक्षरी आणि त्यांच्याकडून मिळालेल्या स्मृतिचिन्हांचा त्यांनी संग्रह केला. त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित होते, तसेच कार खरेदी करण्याइतपत त्यांची ऐपत होती.
त्यांनी  कार घेतलीही; परंतु कार घेण्याएवढे राष्ट्रपतींचे वेतन नसल्याकडे काही नेत्यांनी लक्ष वेधल्यानंतर त्यांनी कार परत केली.
राष्ट्रपती असताना आपल्या एकाही नातीच्या विवाहात त्यांनी भेटवस्तू स्वीकारल्या नाहीत. कुटुंबातील मुलींच्या लग्नात तिला साडी देण्याची परंपरा आहे; मात्र दुसऱ्या कोणीतरी ती घेऊन देण्याऐवजी किंवा नवी घेण्याऐवजी प्रसाद तिच्यासाठी स्वत: साडी विणत.
कार्यकाळ संपत असताना त्यांनी आपले वेतन  आणखी २५ टक्क्यांनी कमी केले. दरमहा ते केवळ अडीच हजार रुपये घेत. निवृत्तीनंतर ते आजारी पडले तेव्हा शहरात राहून चांगले उपचार घेण्याऐवजी ते बिहारमधील सदाकत आश्रमात परतले.
तुम्हाला येथे चांगले उपचार मिळतील, असे सांगितल्यानंतर ‘मै जहाँसे दिल्ली आया हू,
वहीं फिर वापस जाऊंगा’, असे ते म्हणत.

Web Title: Dr. Rajendra Prasad taking half salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app