डॉ. मनमोहनसिंग यांची सीबीआयकडून चौकशी कोळसा घोटाळा : सरकारचे मौन
By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:12+5:302015-01-22T00:07:12+5:30
नवी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरित करण्यात आलेल्या कोळसा खाणप्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे.

डॉ. मनमोहनसिंग यांची सीबीआयकडून चौकशी कोळसा घोटाळा : सरकारचे मौन
न ी दिल्ली : उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरित करण्यात आलेल्या कोळसा खाणप्यांबाबत सीबीआयने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची चौकशी केल्याचे वृत्त आहे. स्वत: त्यांनी किंवा सीबीआयने याबाबत मौन पाळले आहे.सीबीआय अधिकार्यांची एक चमू दोन दिवसांपूर्वी डॉ. सिंग यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेली होती. या तपास संस्थेला विशेष न्यायालयात २७ जानेवारी रोजी स्थिती अहवाल दाखल करायचा आहे. हिंदाल्को कंपनीला तालाबिरा- २ खाणप्याचे वाटप करण्यात आल्याबद्दल १६ डिसेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली. हे वाटप झाले त्यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. सीबीआयचे प्रवक्ते कंचन प्रसाद यांनी चौकशीबाबत भाष्य टाळले. डॉ. मनमोहनसिंग यांच्या एका निकटस्थ सहकार्याला याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी चौकशी झाल्याचा इन्कार केला.----------------------------बिर्ला यांच्या पत्रांबद्दल विचारपूसकुमारमंगलम बिर्ला यांनी ७ मे २००५ आणि १७ जून २००५ रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पत्र पाठवून तालाबिरा-२ खाणीचे वाटप करण्याची विनंती केली होती. या पत्रांबद्दल यापूर्वी कोळसा मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाकडे विचारणा झालेली आहे. सीबीआयचे विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नव्हता. त्याकाळी कोळसा मंत्रालयाची तात्पुरती जबाबदारी सांभाळणार्या डॉ. सिंग यांची चौकशी करून विविध पैलू विचारात घेण्याचा आदेश न्या. पराशर यांनी दिला होता.