शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहन सिंगना कुठून राज्यसभेत नेणार? काँग्रेसमध्ये चर्चा; तामिळनाडूचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 05:10 IST

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची राज्यसभेची मुदत जूनमध्ये संपत असून, त्यांना आता कोठून निवडून आणायचे, याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची राज्यसभेची मुदत जूनमध्ये संपत असून, त्यांना आता कोठून निवडून आणायचे, याचा विचार काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. ते याआधी आसाममधून निवडून आले होते. पण आता तिथे भाजपचे सरकार असून, त्यांना निवडून येण्यासाठी तिथे आवश्यक ती मते मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे अन्य कोणत्या राज्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवायचे, याबाबत विचारविमर्ष सुरू आहे.नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर ज्याप्रकारे डॉ. मनमोहिन सिंग यांनी हल्ला चढवला ते पाहता, काँग्रेसला त्यांची यापुढेही राज्यसभेत गरज भासणार आहे.त्यामुळे तामिळनाडूमधून ते राज्यसभेत जाऊ शकतात. तेथील सहा सदस्य २४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. तामिळनाडूतील राज्यसभेचे जे सदस्य निवृत्त होणार आहेत, त्यात अण्णा द्रमुकचे चार, द्रमुकचा एक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक यांचा समावेश आहे. द्रमुकच्या निवृत्त होणाऱ्या सदस्य आहेत कणिमोळी. त्या तुतीकोडीमधून लोकसभेची निवडणूक लढवत असून, त्या विजयी होतील, अशी द्रमुकला खात्री आहे. त्या जागेसाठी डॉ. सिंग यांचा विचार होईल, असे दिसते.जुळवाजुळवीचे गणितगेल्या वेळी द्रमुकच्या पाठिंब्यावरच भाकपचे सरचिटणीस डी. राजा निवडून आले होते. यंदा ते व डॉ. सिंग अशा दोघांना राज्यसभेवर पाठवायचे, तर द्रमुकचा एकही उमेदवार निवडून जाणार नाही. मात्र अण्णा द्रमुकमध्ये पडलेली फूट व फुटीर गटाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता याआधारे द्रमुकचा एक तसेच डॉ. सिंग व डी. राजा असे तिघे विजयी होतील, असे काँग्रेसचे गणित आहे.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगParliamentसंसद