डॉ. गौरी यांचे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
बार्देस : आसगाव-बार्देस येथील कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाची युवा रेडक्रॉस शाखा व इंडियन रेडक्रॉस सोसायटी बार्देस शाखा यांच्यातर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

डॉ. गौरी यांचे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
ब र्देस : आसगाव-बार्देस येथील कुशे उच्च माध्यमिक विद्यालयाची युवा रेडक्रॉस शाखा व इंडियन रेडक्रॉस सोसायटी बार्देस शाखा यांच्यातर्फे आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. गौरी गावस यांनी मुलींनी प्रौढ वयात शरीरातील होणार्या बदलांबाबत घ्यावयाची काळजी व पोषक आहाराविषयी मार्गदर्शन केले. मुलींमध्ये मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे मुलींनी घाबरून न जाता याचा सामना करावा, असे त्यांनी सांगितले. अनेक विद्यार्थिनींनी आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. या वेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे बार्देस शाखेचे अध्यक्ष इस्माईल विराणी, प्राचार्य श्यामसुंदर कवठणकर उपस्थित होते. प्राचार्य श्यामसुंदर कवठणकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुभाष कवठणकर यांनी केले. (प्रतिनिधी) फोटो : कुशे उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. गौरी गावस. (प्रकाश धुमाळ) १६०२-एमएपी-०९