शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहन सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविण्यास द्रमुकचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:17 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत. डॉ. सिंग व काँग्रेसचेच सँटियस कुजुर यांची मुदत १४ जून रोजी संपत आहे. डॉ. सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवण्यास द्रमुकने नकार दिल्याचे समजते. तामिळनाडू व आसाममध्ये राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत.तामिळनाडूमधून राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी दोन जागांवर द्रमुकचे उमेदवार निवडून जाऊ शकतात. द्रमुकचे प्रमुख कणिमोळी या लोकसभेवर निवडून गेल्याने ती एक जागा रिकामी झाली आहे, तर दुसऱ्या जागेसाठी डी. राजा पुन्हा प्रयत्नशील असून, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे दिसते.कणिमोळी यांच्याऐवजी द्रमुकने डॉ. मनमोहन सिंग यांना उमेदवारी द्यावी, असे काँग्रेसचे प्रयत्न होते. पण टू-जी घोटाळा प्रकरण डॉ. सिंग यांनी नीट हाताळले नाही आणि त्यामुळे द्रमुकची बदनामी झाली, असे त्या पक्षाला वाटत आहे. टू-जी प्रकरण न्यायालयात बराच काळ चालले आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांत आपला पराभव झाला, असे द्रमुक नेत्यांचे म्हणणे आहे. त्या साºयाला ते डॉ. सिंग यांनाच जबाबदार धरत आहेत. त्यामुळे त्यांनी माजी पंतप्रधानांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते.>आसाममधूनही पाठवणे अशक्यचगेल्या वेळी डॉ. मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर गेले होते. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि आता आसाममध्ये काँग्रेसचे केवळ २५ आमदार आहेत. एआययूडीएफच्या १३ आमदारांचा पाठिंबा मिळाला तरी डॉ. सिंग यांना निवडून आणण्यास ती संख्या कमी आहे. भाजपचे ८८ आमदार आहेत. त्याआधारे भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे आसाममध्ये राज्यसभेसाठी एआययूडीएफला पाठिंबा देणे वा आपला उमेदवार उभाच न करणे, असे दोनच पर्याय आता काँग्रेसपुढे आहेत.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग