शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 13:19 IST

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती जगभरात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या जात आहेत. अशाच काही गोष्टी आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत.

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव अंबावाडेकर असं होतं. त्यांना महादेव आंबेडकर नावाचे शिक्षक शिकवत असत. बाबासाहेब हे त्यांचे आवडते विद्यार्थी होते. त्यांच्या सांगण्यावरुनच बाबासाहेबांनी आपलं आडनाव आंबेडकर असे केले.

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ  द रुपी- इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्यूशन' मधून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्यावेळेस अनेक सूचनांचा वापर करण्यात आला.

3) 1955 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मध्य प्रदेश आणि बिहारचं प्रशासन चांगलं चालावं यासाठी दोन्ही राज्याच्या विभाजनाचा सल्ला दिला होता. 45 वर्षांनी या राज्यांचं विभाजन 2000 मध्ये केलं गेलं आणि त्यानंतर छत्तीसगढ आणि झारखंड ही राज्ये तयार झाली.

4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा 'वेटिंग फॉर अ व्हिसा' ही कोलंबिया विद्यापीठात अभ्यासक्रमात वापरली जाते.

5) परदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे पहिले भारतीय आहेत.

6) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लग्न झाले तेव्हा ते 15 वर्षांचे होते. तर रमाबाई या 9 वर्षांच्या होत्या.

7) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील सर्वात जास्त शिकलेले संसद सदस्य होते. ते भारताचे पहिले कायदामंत्री होते. 

8) डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे गरीब ब्राम्हण विद्यार्थ्यांनाही मदत करायचे. ते म्हणायचे की, ज्यांना सामाजिक सुविधा मिळत नाहीत, ते सर्व गरीब हे दलितच आहेत. 

9) भारतीय लेबर कॉन्फरन्सच्या 7 व्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी भारतातील कंपन्यांमध्ये कामाचे तास 14 वरुन 8 केले.

10) अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे जागतिक किर्तीचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. अमर्त्य सेन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानायचे. 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती