डॉ. आंबेडकर स्मारक; लवकरच उद्घाटन
By Admin | Updated: October 25, 2015 23:17 IST2015-10-25T23:17:10+5:302015-10-25T23:17:10+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रिटनमध्ये कधी काळी वास्तव्य राहिलेले घर आता भारताची राष्ट्रीय संपत्ती बनले असून,

डॉ. आंबेडकर स्मारक; लवकरच उद्घाटन
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रिटनमध्ये कधी काळी वास्तव्य राहिलेले घर आता भारताची राष्ट्रीय संपत्ती बनले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उभारल्या जाणाऱ्या स्मारकाचे उद्घाटन करणार आहेत.
डॉ. आंबेडकरांनी दलित, पीडित आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करवून देतानाच मोदी म्हणाले की, दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी ११ नोव्हेंबर रोजी मी ब्रिटनला जाणार आहे.