शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल टाकून सहप्रवाशांना पेटविले; रेल्वे रुळांवर सापडले तिघांचे मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 06:54 IST

केरळमध्ये घडलेला प्रकार; मृतांमध्ये बालकाचा समावेश, नऊ जखमींवर उपचार सुरू

कोझिकोड (केरळ) : धावत्या रेल्वेत एकाने अंगावर पेट्रोल टाकून सहप्रवाशांना पेटवून दिल्याची भयंकर घटना रविवारी रात्री केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात घडली. यात एका बालकासह तिघांचा मृत्यू झाला असून, नऊजण जखमी झाले आहेत. एलत्तूर रेल्वे स्टेशनजवळील रुळावर एक वर्षाचा बालक आणि एका महिलेसह तिघांचे मृतदेह रविवारी रात्री उशिरा आढळून आले. मात्र, त्यांच्या शरीरावर भाजल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यामुळे आग पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. आरोपी व अन्य प्रवासी यांच्या भांडणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, एका प्रवाशाने असे कोणतेही भांडण झाले नसल्याचे सांगितले. अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस रात्री ११ च्या सुमारास कोझिकोड शहर ओलांडून कोरापुझा रेल्वेपुलावर आली तेव्हा अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशांवर पेट्रोल ओतून त्यांना पेटविले. (वृत्तसंस्था)

चौकशीसाठी एसआयटी

पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सोमवारी सांगितले. पोलिसांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचे स्केच जारी केले आहे.

साखळी खेचूून थांबविली ट्रेन...

किरकोळ भाजलेल्या त्यानंतर आरोपी पळून गेला. प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढून रेल्वे थांबवली व जखमींना रुग्णालयात हलवले. रेल्वे कन्नूरला पोहोचल्यानंतर प्रवाशांनी एक महिला आणि एक मूल बेपत्ता असल्याची तक्रार केली. शोध सुरू केला असता एलत्तूर रेल्वे स्थानकाजवळील रुळांवर बालकासह तिघांचे मृतदेह आढळले. या घटनेत नऊजण भाजले. त्यांच्यावर कोझिकोडमध्ये उपचार सुरू आहेत. 

रेल्वेत २ महिलांवर बलात्कार, तीन जवानांविरुद्ध गुन्हा, पोलिसांकडून दोन जवानांना अटक

झाशी येथील वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशनवर लष्कराच्या दोन जवानांनी दोन महिलांवर कथितरीत्या बलात्कार केल्याची घटना घडली. तिसऱ्या जवानाने बलात्कार केला नाही, मात्र तो देखील बलात्काराच्या तयारीत होता, असे पीडित महिलांनी सांगितले. दोन जवानांना अटक करण्यात आली असून, तिसरा फरार आहे. दोन जवान बिहारचे तर तिसरा  उत्तराखंडचा आहे.

पीडित महिलांनी सांगितले की, आम्ही नातेवाईकाला भेटण्यासाठी स्टेशनवर  आलो होतो. स्टेशनबाहेर एक तरुण उभा होता. कॉल करण्यासाठी मोबाइल मागू लागला. आम्ही मोबाइल दिला. यावेळी त्याने आम्हा दोघींना डब्यात नेले. तेथे दोन तरुण आधीच होते. ते डब्यात दारू पीत होते. तेव्हा कळले की, ते लष्कराचे जवान आहेत. दोघांनी आमच्यावर बलात्कार केला. तिसऱ्या जवानालाही बलात्कार करायचा होता. आम्ही आरडाओरडा करू लागलो. तेव्हा आम्ही लष्कराचे आहोत, तुम्ही काहीही करू शकणार नाही, असे म्हणत त्यांनी आम्हा दोघींना डब्यातून खाली उतरून दिले व आमचा मोबाइल हिसकावून घेतला. यानंतर आम्ही एका तरुणाकडे मोबाइल मागितला व ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. 

टॅग्स :Keralaकेरळrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी