मुलाचा खून झाल्याचा पित्याला संशय (फक्त ग्रामीणला वापरावी) पोलिसांची टाळाटाळ : मुख्यमंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:49+5:302015-02-14T23:51:49+5:30

नाशिक : देवळा तालुक्यातील वाखारी येथे आपल्या तण मुलाचा खून करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचण्यात आल्याने या घटनेची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माधव केशव जाधव या पित्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

Doubts the father's murder of the child (only to the villagers): Police Chief | मुलाचा खून झाल्याचा पित्याला संशय (फक्त ग्रामीणला वापरावी) पोलिसांची टाळाटाळ : मुख्यमंत्र्यांना साकडे

मुलाचा खून झाल्याचा पित्याला संशय (फक्त ग्रामीणला वापरावी) पोलिसांची टाळाटाळ : मुख्यमंत्र्यांना साकडे

शिक : देवळा तालुक्यातील वाखारी येथे आपल्या तण मुलाचा खून करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचण्यात आल्याने या घटनेची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माधव केशव जाधव या पित्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
नितीन माधव जाधव (२१) असे या मुलाचे नाव असून, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घराच्या पडवीत गळ्यात मफलरचा फास घेऊन त्याने आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले. त्याचे पिता माधव जाधव यांच्या म्हणण्यानुसार डी.एड.पर्यंत शिकलेल्या नितीनला गावातच किराणा दुकान व पिठाची गिरणी सुरू करायची होती. त्याच्या या व्यवसायाच्या निर्णयामुळे गावातील समव्यावसायिकांच्या पोटात भीतीचा गोळा उठल्याने त्यांनीच त्याचा खून करून आत्महत्त्येचा बनाव रचल्याचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली नाही, उलट जे झाले ते झाले, पोलीस केस करू नका नाही, तर वाढवा होईल असा दम राजाराम चौधरी यांनी आपल्याला दिला. त्याचबरोबर या घटनेची महत्त्वाची साक्षीदार असलेल्या ताराबाईवर गावातील लोक दबाव टाकून तोंड गप्प ठेवण्याचा सल्ला देत असल्याने या सार्‍या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.

Web Title: Doubts the father's murder of the child (only to the villagers): Police Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.