शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:15 IST

AAP Punjab By Election win: लुधियानाची ही पोटनिवडणूक ही येत्या विधानसभेची आणि आपसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती.

दिल्लीतील दारुण पराभवानंतर आपसाठी आजचा दिवस सर्वात चांगला ठरला आहे. चार राज्यांत झालेल्या पाच जागांवरील पोटनिवडणुकीत दोन आपने जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये आपने भाजपच्या उमेदवाराला हरविले आहे, तर पंजाबमध्ये एक जागा जिंकत एका बड्या नेत्यासाठी राज्यसभेची वाट मोकळी केली आहे.   

लुधियाना पश्चिम विधानसभा जागेसाठी १९ जून रोजी पोटनिवडणूक झाली. आपचे आमदार गुरप्रीत गोगी बस्सी यांचे जानेवारीमध्ये निधन झाले होते. त्यानंतर ही जागा रिक्त होती. पक्षाने राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली होती. अरोरा यांनी पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली आणि ही जागा जिंकली. यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. 

काँग्रेसचे भारत भूषण आशु दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर भाजपाच्या जीवन गुप्ता यांना तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. लुधियानाची ही पोटनिवडणूक ही येत्या विधानसभेची आणि आपसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती. कारण या निवडणुकीत अब्जाधीश असलेल्या अरोरा यांना उतरविण्यात आले होते, तसेच त्यांच्या जागी अरविंद केजरीवाल किंवा मनिष सिसोदिया यांना राज्यसभेवर पाठविण्याचा आपचा प्लॅन होता. 

अरोरा हे हरले असते तर दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपविरोधी संदेश गेला असता. तसेच राज्यसभेची जागाही रिक्त झाली नसती. यामुळे केजरीवाल किंवा सिसोदिया या बड्या नेत्यांपैकी एकालाही राज्यसभेवर जाता आले नसते. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, पंजाबचे प्रभारी मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या जागेसाठी ताकद पणाला लावली होती. या एका जागेमुळे आपचे राज्यसभेचे मार्ग खुले झाले आहेत. 

टॅग्स :AAPआपPunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदिया