शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला डबल झटका, मिलिंद देवरा यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा पक्षाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 13:33 IST

राहुल गांधींच्या न्याय यात्रेपूर्वीच काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Apurba Bhattacharya News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करण्यापूर्वीच रविवारी(दि.14) दोन झटके बसले. आधी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milin Deora) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता असाममधील नेते अपूर्वा भट्टाचार्य (Apurba Bhattacharya) यांनीही काँग्रेसला राम-राम ठोकला. राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी दोन नेत्यांचा राजीनामा पक्षासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. 

राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्र आणि आसाममधून दरम्यान, आसाममध्ये काँग्रेस पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक बडे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये असाम काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला होता. राजीनामा दिलेल्या दोन नेत्यांमध्ये नाजावचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बोरा आणि असाम प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पोरीटुष रॉय यांचा समावेश आहे. त्यानंतर आज काँग्रेसचे सचिव अपूर्व भट्टाचार्य यांनी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींची यात्राही महाराष्ट्र आणि आसाममधून जाणार आहे.

काँग्रेसला एकाच दिवसात दोन धक्के काँग्रेसला एका दिवसात दोन धक्के बसले आहेत. पहिला धक्का मुंबईतून बसला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर लिहिले, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेससोबतचे 55 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. गेल्या अनेक वर्षात पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा ऋणी आहे." मिलिंद यांचे वडील मुरली देवरादेखील काँग्रेसचे दिग्गज नेते होते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMumbaiमुंबईAssamआसाम