शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:24 IST

काहीही संबंध नसलेल्या घटनांबाबत अनेकदा मला प्रश्न विचारण्यात आला. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा हेच देईन, तुम्ही का चिंतीत आहात. तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुम्हांला सुरक्षित ठेवले जाईल.

श्रीगनर :  जम्मू-काश्मिरमध्ये तालिबानी अतिरेक्यांचा फैलाव होण्याच्या शक्यतेबाबत काळजी करण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरच्या जनतेला सुरक्षित ठेवले जाणार असल्याने या शक्यतेबाबत चिंता बाळगण्याची गरज नाही, असे श्रीनगरस्थित  लष्कराच्या १५ व्या दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्ट. जनरल डी. पी. पांडेेय यांनी स्पष्ट केले.काहीही संबंध नसलेल्या घटनांबाबत अनेकदा मला प्रश्न विचारण्यात आला. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा हेच देईन, तुम्ही का चिंतीत आहात. तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुम्हांला सुरक्षित ठेवले जाईल. कोणी शस्त्रे हाती उचलले, तर त्याला त्याचे  परिणाम भोगावे लागतील.  त्याचा खात्मा केला जाईल किंवा जेरबंद केले जाईल किंवा त्याला शरणागती पत्करावी लागेल, असे लेफ्ट. जनरल पांडेय यांनी सांगितले. आजच्या सुरक्षा स्थितीतून स्पष्ट होते की, काश्मिरी युवकांना रस्त्यांवर उतरणे बंद केले आहे. त्यांनाही हा खेळ समजला आहे. काश्मिरी  युवकांनाही देशभरात स्पर्धेसाठीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांंनी देशाबाहेर जावे आणि जबाबदार आणि प्रगल्भ माणूस व्हावे, यासाठी त्यांच्यासाठी असे उपक्रम चालूच ठेवले जातील, असेही त्यांनी सांगितले.

काश्मिरी जनतेची मानसिकता बदललीपोलिसांच्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यांतील विदेशी अतिरेक्यांची संख्या ६० ते ७० असावी. जे मूळचे पाकिस्तानी आहेत. स्थानिक युवकांना चिथावणी देत त्यांच्या हाती शस्त्रे देणे, ही या विदेशी अतिरेक्यांची रणनीती आहे. काश्मिरी जनतेची मानसिकता बदलली आहे. आपल्याच समुदायातील काही चुकीच्या मार्गाने घेऊन जात होते, हे त्यांना कळून चुकले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTalibanतालिबानterroristदहशतवादी