काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:22 PM2021-09-21T12:22:33+5:302021-09-21T12:24:05+5:30

काहीही संबंध नसलेल्या घटनांबाबत अनेकदा मला प्रश्न विचारण्यात आला. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा हेच देईन, तुम्ही का चिंतीत आहात. तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुम्हांला सुरक्षित ठेवले जाईल.

Don't worry about Taliban spread in Kashmir, those who take up arms will have to face consequences says Pandey | काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

Next


श्रीगनर :  जम्मू-काश्मिरमध्ये तालिबानी अतिरेक्यांचा फैलाव होण्याच्या शक्यतेबाबत काळजी करण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरच्या जनतेला सुरक्षित ठेवले जाणार असल्याने या शक्यतेबाबत चिंता बाळगण्याची गरज नाही, असे श्रीनगरस्थित  लष्कराच्या १५ व्या दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्ट. जनरल डी. पी. पांडेेय यांनी स्पष्ट केले.

काहीही संबंध नसलेल्या घटनांबाबत अनेकदा मला प्रश्न विचारण्यात आला. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा हेच देईन, तुम्ही का चिंतीत आहात. तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुम्हांला सुरक्षित ठेवले जाईल. कोणी शस्त्रे हाती उचलले, तर त्याला त्याचे  परिणाम भोगावे लागतील.  त्याचा खात्मा केला जाईल किंवा जेरबंद केले जाईल किंवा त्याला शरणागती पत्करावी लागेल, असे लेफ्ट. जनरल पांडेय यांनी सांगितले. आजच्या सुरक्षा स्थितीतून स्पष्ट होते की, काश्मिरी युवकांना रस्त्यांवर उतरणे बंद केले आहे. त्यांनाही हा खेळ समजला आहे. काश्मिरी  युवकांनाही देशभरात स्पर्धेसाठीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांंनी देशाबाहेर जावे आणि जबाबदार आणि प्रगल्भ माणूस व्हावे, यासाठी त्यांच्यासाठी असे उपक्रम चालूच ठेवले जातील, असेही त्यांनी सांगितले.

काश्मिरी जनतेची मानसिकता बदलली
पोलिसांच्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यांतील विदेशी अतिरेक्यांची संख्या ६० ते ७० असावी. जे मूळचे पाकिस्तानी आहेत. स्थानिक युवकांना चिथावणी देत त्यांच्या हाती शस्त्रे देणे, ही या विदेशी अतिरेक्यांची रणनीती आहे. काश्मिरी जनतेची मानसिकता बदलली आहे. आपल्याच समुदायातील काही चुकीच्या मार्गाने घेऊन जात होते, हे त्यांना कळून चुकले आहे. 
 

Web Title: Don't worry about Taliban spread in Kashmir, those who take up arms will have to face consequences says Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.