शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

सरेंडर करू नको, पाकिस्तानात पळून जा, पंजाबमधील खलिस्तानवादी खासदाराने अमृतपालला दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 16:18 IST

Amritpal Singh: आतापर्यंत फरार असलेल्या अमृतपाल सिंगला लोकसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चे प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांनी सल्ला दिला आहे.

उघडपणे फुटीरतावादी भूमिका घेऊन खलिस्तानचं समर्थन करणाऱ्या अमृतपाल सिंगविरोधात पोलीस आणि तपास यंत्रणा आक्रमकपणे शोधमोहीम चालवत आहेत. दरम्यान, आतापर्यंत फरार असलेल्या अमृतपाल सिंगला लोकसभा खासदार आणि शिरोमणी अकाली दल (अमृतसर) चे प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांनी सल्ला दिला आहे. पोलिसांसमोर सरेंडर करू नको, तर पाकिस्तानात पळून जा, असा सल्ला मान यांनी अमृतपाल सिंग याला दिला आहे.

आम्हीही १९८४ मध्ये पाकिस्तानमध्ये गेलो होतो. अमृतपाल सिंगचं पाकिस्तानात पळून जाणं शीख इतिहासासाठी योग्य ठरेल. कारण त्याचे प्राण धोक्यात आहेत, तसेच सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे, असा आरोपही मान यांनी केला आहे. दरम्यान, सिमरनजीत सिंग मान यांनी केलेली टिप्पणी ही १९८४ मधील त्या घटनांकडे इशारा करते ज्यांची परिणती अखेरीस शीखविरोधी दंगलीस कारणीभूत ठरल्या होत्या.

त्यावेळी इंदिरा गांधी यांनी जरनेल सिंग भिंडरावाले आणि इतर खलिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया मोडीत काढण्यासाठी ऑपरेशन ब्लूस्टारचे आदेश दिले होते. त्यानंतर काही महिन्यांतच इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेत १९८४ मध्ये  दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये शीखविरोधी दंगली झाल्या होत्या. त्यात हजारो शीखांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंग हा अमृतसरमधील स्वर्ण मंदिरातील अकाल तख्त, भटिंडा येथील तख्त दमदमा साहिब किंवा रूपनगरमधील आनंदपूर साहिब येथील तख्त श्री केशगड साहिब येथे बैसाखीच्या पूर्वसंध्येपूर्वी आत्मसमर्पण करू शकतो. अशावेळी सिमरनजीत सिंह मान यांचं वक्तव्य समोर आलं आहे.  

टॅग्स :Amritpal Singhअमृतपाल सिंगPunjabपंजाबPoliticsराजकारण