शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्जची नको, सोन्याची तस्करी करा, लगेच जामीन मिळेल- भाजपा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 09:15 IST

धक्कादायक विधानामुळे भाजपा आमदार वादात 

जोधपूर: अमली पदार्थांची तस्करी करु नका. त्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. सोन्याची तस्करी करताना अटक झाल्यास जामीन मिळतो, असं धक्कादायक विधान भाजपचे आमदार अर्जुन लाल गर्ग यांनी केलंय. अमली पदार्थांची तस्करी हा अजामीनपत्र गुन्हा आहे. पण सोन्याची तस्करी करताना अटक झाल्यास अतिशय सहज जामीन मिळतो. त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी न करता सोन्याची तस्करी करा, असं बिलाराचे आमदार अर्जुन लाल गर्ग यांनी म्हटलं. देवासी समुदायाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना गर्ग यांनी बेताल वक्तव्य केलं. गर्ग यांच्या विधानाची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. देवासी समुदायाला संबोधित करताना गर्ग यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचा संदर्भ दिला. 'अमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अंतर्गत कितीजण जोधपूरच्या तुरुंगात आहेत, असा प्रश्न मी विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी बिष्णोई समाजापेक्षा देवासी समुदायचे जास्त लोक तुरुंगात असल्याचं मला समजलं,' असं गर्ग म्हणाले. अमली पदार्थांच्या तस्करीमुळे होणारी शिक्षा टाळण्यासाठी त्यांनी एक धक्कादायक सल्ला यावेळी दिला. 'अमली पदार्थांची तस्करी करुन तुरुंगात जाण्यापेक्षा सोन्याची तस्करी करा. सोन्याच्या तस्करीत लवकर जामीन मिळतो,' असं गर्ग यांनी म्हटलं. 'तुम्हाला दोन नंबरचा धंदा करायचाच असल्यास सोन्याची तस्करी करावी. अमली पदार्थ आणि सोन्याची तस्करीत सारखेच पैसे मिळतात. मात्र सोन्याची तस्करी जास्त सुरक्षित आहे,' असं अजब विधान गर्ग यांनी केलं. देवासी समाजाला सोन्याच्या तस्करी करण्याचा सल्ला दिल्यानं आमदार अर्जुन लाल गर्ग वादात सापडले आहेत. याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गर्ग लडाखला फिरायला गेले आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारRajasthanराजस्थान