शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:47 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बेजबाबदार विधाने करून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची थट्टा करू नका

नवी दिल्ली - अकोला जिल्ह्यात  १७ नोव्हेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेतील सभेत स्वा. सावरकर यांच्याविषयी बेजबाबदार विधान केल्याबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फटकारले. मात्र त्यांच्या विरोधातील फौजदारी कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली. स्वातंत्र्यसैनिकांची थट्टा करू नका असे न्या. दीपांकर दत्ता व न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने राहुल यांना सुनावले. वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की, समाजात तेढ निर्माण करण्याचा गुन्हा राहुल यांनी केला नाही.

देशाचा इतिहास माहीत नसेल तर नको ते बोलता कशाला? 

सर्वोच्च न्यायालयानेराहुल गांधी यांना सुनावले आहे की, तुम्ही स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करू नका, देशाच्या इतिहासाची माहिती नसेल तर बेजबाबदार विधाने करू नका. राहुल गांधी हे एका राजकीय पक्षाचे नेते असून, त्यांनी अशी टीका करणे योग्य आहे का? महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुजले जाते. ते लक्षात घ्या व नको ती विधाने करू नका हे नीट ध्यानात ठेवा. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक विधानांबद्दल खटला दाखल करणारे वकील नृपेंद्र पांडे, उत्तर प्रदेश सरकार यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली. राहुल गांधी यांच्या विरोधातील खटला रद्द करण्यास नकार देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला.

‘...तर आम्ही स्वत:हून दखल घेऊ’यापुढे जर त्यांनी बेजबाबदार विधाने केली तर आम्ही त्याची स्वत:हून दखल घेऊ असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांच्याविषयी एखादी व्यक्ती अशी बेजबाबदार विधाने कशी करू शकते, असा संतप्त सवालही न्या. दीपांकर दत्ता यांनी केला. 

आजीने सावरकरांचा गौरव केला हे माहीत आहे का? : न्या. दत्ता यांनी सवाल केला की, राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचा गौरव करणारे पत्र संबंधितांना पाठविले होते हे त्यांच्या नातवाला माहिती आहे का? 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर