शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 14:44 IST

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ईडीच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने सोमवारी कर्नाटकातील एका प्रकरणावर ईडीला चांगलेच फटकारले आहे. ईडीचा कथित राजकीय वापर होण्यावरून कोर्टाने सुनावले. सुप्रीम कोर्टाने कर्नाटक मुख्यमंत्र्‍यांच्या पत्नीविरोधात दाखल केलेली ईडीची याचिका फेटाळली आहे आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश जैसे थे ठेवला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर ही संपूर्ण सुनावणी झाली. त्यात सरन्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना फैलावर घेतले. या प्रकरणी न्याय दिल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी अखेर न्याय झाला अशी प्रतिक्रिया दिली. 

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ईडीच्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली. ईडीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते ज्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या पत्नी पार्वतीविरोधात MUDA घोटाळ्याअंतर्गत कारवाई करण्यास रोखले होते. ईडीकडून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसवी राजू यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली. सुप्रीम कोर्टाने याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं की, श्रीमान राजू कृपा करून तुम्ही आम्हाला तोंड उघडायला लावू नका. नाहीतर आम्हाला ईडीविरोधात कठोर शब्दांचा वापर करावा लागेल. दुर्दैवाने मला महाराष्ट्राबाबत काही अनुभव आहेत. ते संपूर्ण देशात पसरवू नका. राजकीय लढाई मतदारांसमोर लढायला हवी, त्यात तुमचा का वापर होऊन देताय? असा संतप्त प्रश्न सुप्रीम कोर्टाने ईडीला विचारला. 

काय आहे प्रकरण?

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे जमीन वाटप केल्याप्रकरणी ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या पत्नी पार्वती यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. ज्याला हायकोर्टाने नाकारले. हायकोर्टात पार्वती यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला होता की, आम्ही सर्व १४ प्लॉट सरेंडर केले होते. ना आमच्याकडे कथित गुन्ह्याचे उत्पन्न आहे ना आम्ही त्याचा वापर केला होता असं सांगण्यात आले. हायकोर्टाने या प्रकरणी ईडीला कारवाई करण्यास रोखले होते. त्याविरोधात ईडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयKarnatakकर्नाटक