शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हाला सोडून जाऊ नका हो सर'... हुंदके देत-देत मुलांची विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:22 IST

ही छायाचित्रे पाहून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मनाला मायेचा पाझर फुटला.

चेन्नई: हल्लीच्या काळात समाजातील इतर घटकांप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेही बदलले आहे. पूर्वीच्या काळी गुरू-शिष्यांच्या नात्यात असणारी आपुलकी हल्लीच्या व्यवसायिक वातावरणात कुठेतरी लुप्त झाल्यासारखी दिसते. मात्र, तामिळनाडूतील एका घटनेमुळे अनेकांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते किती घट्ट आणि भावनिक असू शकते, हे पाहायला मिळाले. चेन्नईमधील तिरुवल्लरच्या वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या छायाचित्रांमध्ये काही विद्यार्थी एका शिक्षकाभोवती गराडा करून उभे असल्याचे दिसत आहे. या 28 वर्षीय शिक्षकाचे नाव जी भगवान असे आहे. ते वेलियाग्राम शाळेत सहावी ते दहावी इयत्तेला इंग्रजी विषय शिकवतात. विद्यार्थ्यांमध्ये ते खूपच लोकप्रिय आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्याचे पत्र आले. बुधवारी त्यांचा वेलियाग्राम शाळेतील शेवटचा दिवस होता. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालत दुसऱ्या न शाळेत जाण्याची विनंती केली. यावेळी जवळपास सर्वच विद्यार्थी ओक्साबोक्शी रडत होते. विद्यार्थ्यांचे हे प्रेम पाहून जी भगवान यांच्या डोळ्यातूनही अश्रूधारा वाहू लागल्या. हा एकूणच प्रसंग कोणाचेही काळीज हेलावून टाकणारा होता. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही छायाचित्रे पाहून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मनाला मायेचा पाझर फुटला. शिक्षण विभागाने त्यांच्या बदलीला 10 दिवसांची स्थगिती दिली. ही मुदत संपल्यानंतर आता स्थानिक पालक व शाळा प्रशासनाशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.  

टॅग्स :SchoolशाळाViral Photosव्हायरल फोटोज्Teacherशिक्षक