शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:34 IST

China-India Relation News: चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सक्त इशारा दिला आहे.

चिनी सैन्याकडून भारताच्या हद्दीत सातत्याने होणारी घुसखोरी आणि गलवान येथे भारत आणि चीनच्या सैन्यदलांमध्ये झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. या दरम्यान, चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सक्त इशारा दिला आहे. त्यात चिनी नागरिकांना भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेजवळ जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. भारतामध्ये अवैधपणे प्रवेश केल्यास कठोर कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असेही चिनी दूतावासाने म्हटले आहे.

याबाबत माहिती देताना चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे की, भारत आणि नेपाळने सीमावर्ती भागांमध्ये गस्त आणि शोधमोहीम खूप वाढवली आहे. असं असतानाही इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत काही चिनी नागरिक हे भारत आणि नेपाळच्या सीमेजवळ जात आहेत. हल्लीच असे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. ज्यामध्ये भारतीय सीमा सुरक्षा दलाने त्यांना अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

या रिपोर्टनुसार चीनकडून सांगण्यात आले की, भारत आणि नेपाळ यांच्यामधील सीमा खुली आहे. इथे सीमाभाग दर्शवणाऱ्या खाणाखुणा खूपच कमी आहेत. येथून नेपाळी आणि भारतीय नागरिक आपलं ओळख पत्र दाखवून सीमा पार करू शकतात. मात्र परदेशी नागरिकांना वैध व्हिसा असल्याशिवाय या सीमेवरून भारतामध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही आहे. अशा परिस्थितीत जर कुणी नागरिकाने चुकून भारताची सीमा पार केली, तर त्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

चीनने सांगितले की, भारतामध्ये बेकायदेशीर प्रवेशाबाबतचे कायदे कठोर आहेत. तसेच या परिस्थितीत दोषी व्यक्तीला २ ते आठ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच येथे अनावधानाने जरी प्रवेश केला. तरी अटकेची कारवाई होऊन खटला चालू शकतो. तसेच या स्थितीत दोषी व्यक्तीला २ ते ८ वर्षांचा तुरुंगवास आणि जबर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यात जामिन देण्याची कुठलीही तरतूद नाही आहे. तसेच कुठल्याही आणिबाणीच्या परिस्थितीत चिनी नागरिकांनी त्वरित नेपाळमधील दूतावासाशी संपर्क साधावा, असं आवाहनही चीनकडून करण्यात आलं आहे.   

टॅग्स :chinaचीनIndiaभारतNepalनेपाळ