शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या एसटी चालकावर हल्ला: भाषिक वादाचा रंग देवू नका, मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:24 IST

बेळगाव : बस वाहकावरील हल्ल्याप्रकरणी मी पोलिस प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. हा केवळ हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वाद असून, ...

बेळगाव : बस वाहकावरील हल्ल्याप्रकरणी मी पोलिस प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. हा केवळ हा दोन व्यक्तींमधील वैयक्तिक वाद असून, त्याला भाषिक वादाचा रंग देण्यात येऊ नये. तसेच यासंदर्भात कोणीही बेळगावमध्ये येऊन आंदोलन करू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या घटनेला कन्नड आणि मराठी भाषिकांमधील वाद म्हणून सादर केले जाऊ नये. अन्यथा त्याचा परिणाम बेळगाव जिल्ह्याच्या विकासावर होईल. हे एक सर्वसामान्य प्रकरण आहे. सदर घटनेमुळे कन्नड आणि मराठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिणामी बस सेवा बंद झाली आहे. सरकारला आणि बेळगावला त्रास एवढीच त्या घटनेची फलनिष्पत्ती आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे बेळगावच्या विकासावर परिणाम होत आहे.सदर प्रकरणी पोलिसांचे काम तुम्ही करू नका. पोलिसांनी गुन्हे नोंदवून घेतले आहेत, त्यांना त्यांचे काम करू द्या. या पद्धतीच्या घटनांमध्ये कर्नाटकातल्या संघटना आक्रमक झाल्या की महाराष्ट्रातल्या संघटना आक्रमक होतात. या पद्धतीची प्रकरणे हाताळण्यास कर्नाटकमहाराष्ट्राचे पोलिस आणि सरकार सक्षम आहे.बेळगावमध्ये घडलेल्या घटनेवरून उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात बेळगावचे जिल्हाधिकारी आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून समन्वयाने दोन्ही राज्यांची बससेवा पूर्ववत सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बस वाहकासंदर्भातील प्रकरणात जो कोण दोषी आढळेल त्यावर पोलिस कारवाई करतीलच. पोलिस योग्य ती कार्यवाही करत असल्यामुळे कर्नाटक रक्षण वेदिके अथवा कोणीही बेळगावमध्ये येऊन आंदोलन करू नये, असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकministerमंत्री