शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेला अटक केल्याच्या निषेधार्थ दिल्लीत निदर्शने, चिन्मयानंद यांची पाठराखण करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 06:00 IST

चिन्मयानंद यांच्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा बलात्कार पीडितेवर आरोप आहे.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांनी बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात अटक केल्यामुळे दिल्लीतील विद्यार्थीवर्ग संतप्त झाला आहे. या अटकेच्या निषेधार्थ येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी शनिवारी जंतरमंतर येथे जोरदार निदर्शने केली.चिन्मयानंद यांच्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा बलात्कार पीडितेवर आरोप आहे. चिन्मयानंद यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर एक महिन्याने पोलिसांनी तिच्यावर ही कारवाई केली आहे. जंतरमंतर येथील निदर्शनात सहभागी झालेल्या आॅल इंडिया वूमन्स डेमोक्रॅटिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष एस. पुनियावता यांनी सांगितले की, चिन्मयानंद प्रकरणात बलात्कार पीडितेला बळीचा बकरा केले जात आहे. चिन्मयानंद यांची सरकारने पाठराखण करू नये व पीडित युवतीची सुटका करावी, अशी मागणी या निदर्शकांनी केली.जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील एक विद्यार्थिनी रेखा सिंह हिने सांगितले की, भाजप सरकारने बलात्कार प्रकरणांतील आरोपींची पाठराखण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारने केला होता. पीपल्स डेमोक्रॅटिक स्टुडंट्स युनियनचा सदस्य जयदीप याने सांगितले की, सत्ता व पैसा असलेल्या लोकांनाच या देशात न्याय मिळतो, असे सध्या वातावरण आहे.चिन्मयानंद यांना वाचविण्याचा प्रयत्न?चिन्मयानंद प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीला अटक करून २४ सप्टेंबर रोजी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आपल्या मुलीविरोधात पोलिसांकडे काहीही पुरावे नाहीत. पोलीस चिन्मयानंद यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी