शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका, ‘एआय’ हा शिक्षणाचा पर्याय नसावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:35 IST

या कार्यक्रमाला कोईम्बतूर, रायपूर, गुवाहाटी आणि गुजरात येथील विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाला आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही मार्गदर्शन आणि मूल्यवृद्धीसाठी वापरावी, शिक्षणाचा पर्याय म्हणून नव्हे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विद्यार्थ्यांना दिला. ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या नवव्या पर्वातील दुसऱ्या भागात त्यांनी सांगितले की, काही मुलांसाठी मोबाइल फोन हेच जणू सर्वस्व झाले आहे; मोबाइल किंवा टीव्ही पाहिल्याशिवाय त्यांना जेवणही जात नाही.

या कार्यक्रमाला कोईम्बतूर, रायपूर, गुवाहाटी आणि गुजरात येथील विद्यार्थ्यांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. मोदी म्हणाले की, प्रत्येक काळात नव्या तंत्रज्ञानाबाबत (उदा. संगणक, मोबाइल फोन आदी.) चिंता व्यक्त होत आली आहे. त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही. तंत्रज्ञानाचा मी गुलाम बनणार नाही, असा ठाम संकल्प विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. जगात नोकऱ्यांचे स्वरूप नेहमी बदलत राहाणार आहे. तंत्रज्ञान समजून घेणे, स्वतःच्या क्षमतांचा विस्तार करणे आवश्यक आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले...परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात आणि पुरेशी झोप घ्यावी.परीक्षेची नीट आणि समजून तयारी केल्यानंतर तुम्हाला कधीही तणाव जाणवणार नाही. पालकांनी आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये.अभ्यास आणि आवड हे दोन्हीही उपयुक्त असून, या गोष्टी एकमेकांना पूरक ठरू शकतात. 

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये विद्यार्थ्यांना सल्लापंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भविष्यातील नेतृत्वाकडून निर्भयता हा गुण अपेक्षित आहे. नेतृत्व म्हणजे निवडणुका किंवा भाषणे नव्हे, तर इतरांना समजावून सांगण्याची आणि पटवून देण्याची क्षमता. तंत्रज्ञानातील नवकल्पना असोत किंवा व्यावहारिक उपाययोजना अशा कोणत्याही क्षेत्रात आपल्याला काय कामगिरी करायची आहे, हे आधी मनाशी ठरविले पाहिजे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Don't be tech slaves; AI isn't education: Modi's advice.

Web Summary : PM Modi advises students to use technology for guidance, not replacement of education. He stressed understanding technology, expanding capabilities, and avoiding over-reliance on devices. He also advised students to solve previous papers, get enough sleep & parents not to compare children.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थी