शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या तपासाच्या कक्षेत; १९ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 08:24 IST

भाजपाला ६८ टक्के, तर काँग्रेसला ११ टक्के रक्कम, निवडणूक रोख्यांच्या विरोधातील सुनावणी १९ रोजी सुप्रीम कोर्टात 

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : सरकारच्या निवडणूक रोख्यांच्या योजनेच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १९ सप्टेंबर रोजी सूचीबद्ध केली आहे. यामुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या तपासाच्या कक्षेत येऊ शकतात. 

याचिकाकर्त्यांनी या योजनेला आव्हान दिले आहे की, संपूर्ण प्रक्रिया निनावी आहे. कारण, राजकीय पक्षांना पैशाचा स्त्रोत दाखविण्याची गरज नाही. सरकारने असा युक्तिवाद केला होता की, पैसे काळे असण्याची शक्यता नाही. कारण, ते चेकद्वारे द्यावे लागतील. तथापि, न्यायालयाने २०१९ मध्ये निर्देश दिले होते की, राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक रोख्यांबाबत तपशील सादर करणे आवश्यक आहे; परंतु सुप्रीम कोर्टाला वेळ न मिळाल्याने हे प्रकरण नियमित सुनावणीसाठी तीन वर्षांपासून प्रलंबित राहिले. यावर्षी ५ एप्रिल रोजी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी या प्रकरणाचा उल्लेख केल्यानंतर माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सुनावणीस सहमती दर्शविली होती.  

देणग्यांचे सखोल विश्लेषण करताना १९ राजकीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे निधी प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. याद्वारे कोणीही राजकीय पक्षांना निनावी पैसे देऊ शकतो. मे २०१९ मध्ये तब्बल १०५ पक्षांनी निवडणूक आयोगाला डाटा सादर केला होता. निवडणूक आयोगाच्या यादीत १९ पैकी १७ पक्षांची नावे होती. 

आकडे काय सांगतात... २०१७ -१८ आणि २०१९-२० मधील रोखे प्राप्त करण्याबाबत इतर दोन पक्षांची यादी स्वतंत्रपणे करण्यात आली. या पक्षांना ६२०१ कोटी रुपये मिळाले आणि या बेहिशेबी पैशांपैकी ६८ टक्के रक्कम एका पक्षाला म्हणजे भाजपाला दान करण्यात आली. २०१७ -१८ आणि २०१९-२० दरम्यान एकूण ६२०१ कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांपैकी भाजपाचा वाटा ४२१५.८९ कोटी रुपये होता. तर, त्यापाठोपाठ काँग्रेसला ७०६.१२ कोटी रुपये किंवा ११.३ टक्के रक्कम मिळाली आणि उर्वरित इतरांना मिळाली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय