चैतन्य गोशाळेला पाच लाखांची देणगी
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:28+5:302015-02-14T23:51:28+5:30
अहमदनगर : येथील शांतीलालजी मुथा (भिगवणकर) यांनी त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त पाच लाखांची देणगी चैतन्य गोशाळेला देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला.

चैतन्य गोशाळेला पाच लाखांची देणगी
अ मदनगर : येथील शांतीलालजी मुथा (भिगवणकर) यांनी त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त पाच लाखांची देणगी चैतन्य गोशाळेला देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला. देवळाली पानाची ( ता. आष्टी) येथे हभप मुकुंद जाटदेवळेकर यांनी स्थापन केलेल्या चैतन्य गोशाळेत मुथा यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा गुरूवारी पार पडला. राष्ट्रसंत गोविंददेवगिरी महाराज व जाटदेवळेकर महाराज यांच्या आध्यात्मिक सहवासात राहिलेले मुथा गेल्या ३५ वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत आहेत. गोशाळेच्या शेड बांधकामासाठी त्यांनी ही देणगी दिली असून, तेथे कोठेही आपले नाव न वापरण्याचा मोठेपणा त्यांनी दाखवला आहे. यावेळी मुथा यांचे चिरंजीव अभय मुथा, गौतम मुथा, जयश्री, शोभा, स्नेहा मुथा आदी कुटुंबीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)-----------फोटो - १४ मुथा सत्कारगोशाळेला पाच लाखांची देणगी दिल्याबद्दल जाटदेवळेकर महाराज यांनी शांतीलाल मुथा यांचा सत्कार केला.