‘आप’च्या देणग्यांचा आलेख चढता
By Admin | Updated: March 15, 2015 23:13 IST2015-03-15T23:13:49+5:302015-03-15T23:13:49+5:30
अंतर्गत कलह वाढला म्हणून आम आदमी पार्टीला (आप) मिळणाऱ्या देणग्यांचा ओघ मात्र आटलेला नाही. उलट यात वाढ झाली आहे

‘आप’च्या देणग्यांचा आलेख चढता
नवी दिल्ली : अंतर्गत कलह वाढला म्हणून आम आदमी पार्टीला (आप) मिळणाऱ्या देणग्यांचा ओघ मात्र आटलेला नाही. उलट यात वाढ झाली आहे. दिल्लीत सरकार स्थापन केल्यापासून ‘आप’ला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक देणग्या मिळाल्या. त्याआधी लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षाला सुमारे ८० लाखांच्या देणग्या मिळाल्या होत्या.
‘आपट्रेंडस्’ वेबसाईटनुसार यंदा ८ फेबु्रवारी ते ७ मार्चदरम्यान ‘आप’च्या देणग्यांची रक्कम ही लोकसभा निवडणुकीनंतर (१७ मे ते १६ जून २०१४) मिळालेल्या रकमेहून अधिक आहे. निवडणुकीदरम्यान पक्षासाठी देणगी गोळा करणाऱ्या मोहिमेचा भाग असलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली.