शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

Donald Trump Visit: साबरमती आश्रमाला ट्रम्प यांची धावती भेट; पण गांधीजींचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 2:00 AM

१५ मिनिटांत गांधी महात्म्याची तोंडओळख

अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व ‘फर्स्ट लेडी’ मेलानिया ट्रम्प यांनी सोमवारी दुपारी येथील साबरमती आश्रमाला केवळ १५ मिनिटांसाठी धावती भेट दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या आश्रमाला भेट देणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.मोटेरा स्टेडियममधील मुख्य कार्यक्रमाच्या आधी ट्रम्प दाम्पत्य साबरमती आश्रमात पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही तेथे आले. मोदी यांना ट्रम्प व त्यांच्या पत्नीसोबत आश्रमाचा फेरफटका मारून पाहुण्यांना आश्रमाविषयी आणि गांधीजींच्या तेथील प्रदीर्घ वास्तव्याविषयी थोडक्यात माहिती दिली. महात्मा गांधी व कस्तुरबा आश्रमात जेथे राहत त्या आश्रमातील ‘हृदय कुंज’ दालनही मोदींनी ट्रम्प यांना दाखवले. आश्रमाच्या भेटीच्या वेळी मोदींप्रमाणेच ट्रम्प व त्यांच्या पत्नीनेही खांद्यावर खादीचे उपरणे घेतले होते. मोदी व ट्रम्प यांना साबरमती नदीपात्राचे विस्तृत दर्शन घेता यावे यासाठी आश्रमाच्या पाठीमागे नदी किनारी एक खास चौथरा तयार करण्यात आला होता; परंतु रणरणते ऊन व वेळेचा अभाव यामुळे कार्यक्रमातील हा संभाव्य भाग वगळण्यात आला.ट्रम्प दाम्पत्याने चालवला चरखाआश्रमात ठेवलेला गांधीजींचा चरखाही ट्रम्प दाम्पत्याने चालवून पाहिला व त्यावर सूतकताई कशी करतात, हेही समजून घेतले. स्वातंत्र्यलढा व स्वदेशीसंदर्भात गांधीजींनी चरखा आणि त्यावरील सूतकताईस कसे महत्त्व दिले होते, हेही मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना समजावून सांगितले.गांधीजींचा विसरआश्रमातील महात्माजींच्या तसबिरीला चांदीच्या फुलांचा हार घालून ट्रम्प यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली खरी, पण या भेटीची स्मृती चिरंतन राहावी म्हणून ट्रम्प यांनी तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये जो संदेश लिहिला त्यात त्यांनी गांधीजींचा उल्लेखही केला नाही. त्यांनी लिहिले की, या अप्रतिम भेटीबद्दल मी माझे थोर मित्र मोदी यांचा आभारी आहे!

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधी