शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Donald Trump Visit: जनतेला धार्मिक स्वातंत्र्य मिळावं ही तर मोदींची इच्छा, डोनाल्ड ट्रम्प CAAवर बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 19:05 IST

विशेष म्हणजे दिल्लीत सीएएवरून उसळलेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोललो.

ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारत-अमेरिकेतल्या 3 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोललो. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे अशी त्यांची इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

नवी दिल्लीः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारत-अमेरिकेतल्या 3 अब्ज डॉलरच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे दिल्लीत सीएएवरून उसळलेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोललो. लोकांना धार्मिक स्वातंत्र्य मिळावे अशी त्यांची इच्छा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर परिश्रम घेतले आहेत.त्या मुद्द्यावरून त्यांच्यावर वैयक्तिक टीका झाल्याचं मी ऐकले, परंतु मी त्यावर चर्चा केली नाही. त्यांचा हा अंतर्गत विषय असून, या सर्व गोष्टी भारतावर अवलंबून आहेत.मी लवकरच भारत सोडून परत अमेरिकेला जाणार आहे. ते त्यांच्या लोकांसाठी योग्य निर्णय घेतील. मी या विषयावर आणखी बोलू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.तसेच त्यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरही मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. काश्मीर ही भारत आणि पाकिस्तानमधील एक मोठी समस्या आहे, मोदी त्या समस्येवर काम करत आहेत. आमच्यात आज याबद्दल बरेच बोलणं झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी माझे खूप चांगले संबंध असल्याने मला जर या विषयात मध्यस्थी करण्यास सांगितल्यास मी नक्कीच करेन.काश्मीर हा बराच काळ लोकांच्या दृष्टीने एक न सुटलेला विषय आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. आम्ही आज दहशतवादाविषयी चर्चा केली. व्यापार संबंधांवर ट्रम्प म्हणाले, आमच्याकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले जात आहे. मला वाटते की, भारताशी करार करताना सर्वच गोष्टींचा विचार व्हायला हवा.हार्ले-डेव्हिडसन मोटारसायकली भारत आमच्याकडे  पाठवतो, तेव्हा भारताला आम्ही भारी आयात शुल्क देतो. परंतु भारतात जेव्हा आम्ही एखादी वस्तू निर्यात करतो, तेव्हा असं होत नाही. त्यामुळे त्यावर एक तोडगा निघण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!

Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा

धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर

Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदी