Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी आज प्रचाराचा धडाका लावला आहे. मुजफ्फरपूरमधील सभेनंतर दोन्ही नेत्यांनी दरभंग्यात सभा घेतली. यावेळी राहुल गांधींनीडोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत, पंतप्रधान मोदींवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
ट्रम्पने मोदींचा 50 वेळा अपमान केला, पण...
राहुल गांधी म्हणाले की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरात जाऊन सांगतात की, त्यांनी नरेंद्र मोदींना घाबरवून ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवले. ट्रम्पने हे 50 वेळा सांगितले, पण मोदींच्या तोंडून एक चकार शब्दही निघाला नाही. मोदींमध्ये सत्य सांगण्याचे धैर्यच नाही. ट्रम्प रोज वेगवेगळ्या देशांत जाऊन मोदींचा अपमान करतात आणि मोदी एकदाही म्हणत नाहीत की, ट्रम्प खोटे बोलत आहेत. असा नेता देशाचा सन्मान कसा राखणार? आणि असा माणूस बिहारचा विकास काय करणार?'
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
इंदिरा गांधींसारखी निर्भयता हवी
राहुल गांधींनी 1971 च्या भारत-पाक युद्धाचा उल्लेख करत म्हटले की, 'त्या वेळी अमेरिका भारताला धमक्या देत होती, पण इंदिरा गांधींनी ठामपणे सांगितले, ‘आम्ही तुमच्यापासून घाबरत नाही.’ खरे पंतप्रधान असे असतात. भीतीत जगणारे नेते देशाचे रक्षण करू शकत नाहीत. बिहारला असे नेतृत्व हवे, जे सत्य बोलेल, अन्यायाविरुद्ध उभे राहील आणि गरीबांच्या बाजूने निर्णय घेईल.'
श्रीमंतांसाठी स्वच्छ पाणी, गरीबांसाठी घाण पाणी”
राहुल गांधींनी दिल्लीतील यमुना नदीच्या प्रदूषणावरून मोदींना लक्ष्य केले. 'एकीकडे यमुना नदीत घाण पाणी वाहते आणि दुसरीकडे मोदींसाठी पाइपने स्वच्छ पाणी आणले जाते. टीव्हीवर तो पाइप दिसल्यामुळे मोदी तिथे गेले नाहीत. हा सगळा ड्रामा होता. देशात दोन भारत आहेत, श्रीमंतांसाठी स्वच्छ पाणी आणि गरीबांसाठी घाण पाणी,' अशी टीकाही राहुल गांधींनी केली.
मोदी अदानी-अंबानींचे सेवक
कॉर्पोरेट्सशी असलेल्या सरकारच्या संबंधांवर टीका करत राहुल म्हणाले, 'अंबानींच्या लग्नात मोदी गेले, पण मी नाही गेलो. कारण मोदी हे अदानी-अंबानींचे सेवक आहेत. ते लोकांसाठी नव्हे, तर काही श्रीमंतांसाठी रस्ते मोकळे करणारे पंतप्रधान आहेत. नोटबंदी आणि चुकीच्या GSTमुळे लघु उद्योग संपले. बिहार आणि धारावीतील जमीन किरकोळ किमतीत विकली गेली. मोदी म्हणतात त्यांनी स्वस्त इंटरनेट दिले, पण फायदा कोणी घेतला? Jioच्या मालकाने, सामान्य नागरिकांनी नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Web Summary : Rahul Gandhi attacked PM Modi, alleging Trump insulted him repeatedly. He criticized Modi's silence and contrasted it with Indira Gandhi's courage. He also raised concerns about water access disparity and Modi's ties with corporates.
Web Summary : राहुल गांधी ने पीएम मोदी पर हमला करते हुए आरोप लगाया कि ट्रम्प ने बार-बार उनका अपमान किया। उन्होंने मोदी की चुप्पी की आलोचना की और इसकी तुलना इंदिरा गांधी के साहस से की। उन्होंने पानी की पहुंच में असमानता और मोदी के कॉरपोरेट्स के साथ संबंधों पर भी चिंता जताई।