डॉन आता इंटरपोलसोबत...

By Admin | Updated: August 29, 2014 02:16 IST2014-08-29T02:16:28+5:302014-08-29T02:16:28+5:30

गुन्हेगारीला संपविण्यासाठी व्यापक जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने इंटरपोलने सुरू केलेल्या टर्न बॅक क्राईम या अभियानाच्या अ‍ॅम्बेसेडरपदी बॉलीवूडचा डॉन शाहरूख खान याची नियुक्ती करण्यात आली आहे

Don now with Interpol ... | डॉन आता इंटरपोलसोबत...

डॉन आता इंटरपोलसोबत...

नवी दिल्ली : गुन्हेगारीला संपविण्यासाठी व्यापक जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने इंटरपोलने सुरू केलेल्या टर्न बॅक क्राईम या अभियानाच्या अ‍ॅम्बेसेडरपदी बॉलीवूडचा डॉन शाहरूख खान याची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत टिष्ट्वट करताना किंग खानने, आता डॉन इंटरपोलसोबत आहे हा.. हा... ही कशी विडंबना आहे असे म्हटले आहे. या पदावर नियुक्त केलेले ते पहिलेच भारतीय अभिनेते आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटाचा रिमेक असलेल्या दुसऱ्या डॉनमध्ये डॉनची भूमिका शाहरूख खानने वठविली होती. या मोहिमेत सहभागी झाल्यानंतर मी गौरवान्वित झाल्याचा अनुभव घेत असल्याचे शाहरूखने म्हटले आहे. या संधीसाठी त्यांनी आभारही व्यक्त केले आहेत.
इंटरपोलने फ्रान्सच्या लियोन येथील मुख्यालयातून जारी केलेल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, कायद्याप्रती नागरिकांमध्ये सन्मान जागवणे व गुन्ह्यांविरुद्ध लढण्यात सहभागी करून घेण्यासाठी शाहरूख प्रयत्न करतील. शाहरूखसोबतच जॅकी चॅन हेदेखील एक अ‍ॅम्बेसेडर राहणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Don now with Interpol ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.