शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणातील दबंगगिरी: पत्नीच्या खासदारकीला बाहुबलींचे ‘बळ’! नितीशकुमार व लालू यादवांनी दिली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 08:00 IST

Bihar Lok Sabha Election 2024: दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असलेल्या दोषींना सुटकेनंतर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढविता येत नाही. बिहारच्या राजकारणाची सुत्रे हलविणाऱ्या या बाहुबलींनी आता आपआपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.

- राजेश शेगाेकार पाटणा - दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असलेल्या दोषींना सुटकेनंतर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढविता येत नाही. बिहारच्या राजकारणाची सुत्रे हलविणाऱ्या या बाहुबलींनी आता आपआपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. अशा बाहुबलींना साेबत ठेवण्यासाइी जडीयुचे नितीश कुमार व आरजेडीचे लालुप्रसाद यादव यांच्या पक्षांनी पायघड्या टाकल्या आहेत हे विशेष.

पप्पू यादवांची बंडखाेरी पूर्णीयाच्या जागवेर काॅंग्रेसचे राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना उमेदवारी हवी हाेती जागा वाटपात हा मतदारसंघ राजदला गेला असून तेथे राजदच्या बिमा भारती यांना उमेदवारी दिली आहे. ‘जान देंगे लेकीन पूर्णीया नही देंगे’ अशी घाेषणा करणारे यादव यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.  

कटीहारमध्ये घरचा आहेरदूसरीकडे कटिहार मतदारसंघ काॅग्रेसला मिळाला असून तेथे काँग्रेसने तारिक अन्वर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात राजदचे राज्यसभा सदस्य अहमद अशफाक करीम यांनीही बंडाचे निशाण फडकवून राजद ला घरचा आहेर दिला आहे. 

- अशोक महतो हे बिहारमधील कुख्यात नाव. काॅंग्रेसच्या खासदार राजाे सिंग यांचा मृत्यू झालेल्या शेखपुरा व जेलब्रेक अशा हत्याकांडात दाेषी. ६२ वर्षाच्या अशाेक महताे यांनी ४६ वर्षाच्या अनिता यांच्याशी लग्न केले व त्याच दिवशी राजदने मुंगेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली.

- अवधेश मंडल काेसी व पूर्णीयामधील माेठा गुन्हेगार, खुन, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यात खटले दाखल आहेत. विशेष म्हणजे पत्नी बीमा भारती यांनीही त्याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार केली हाेती. त्याच बिमा भारती आता राजदच्या तिकिटावर पूर्णियातून निवडणूक लढवणार आहेत.

- आनंद मोहनला गोपालगंजचे जिल्हा दंडाधिकारी जी कृष्णय्या यांनी लिंचिंग प्रकरणी दोषी ठरवून १६ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांची पत्नी लवली आनंद शिवहर मतदारसंघातून जेडीयु च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना औरंगाबाद येथून निवडणूक लढवायची हाेती.

-जेडीयूचे आमदार रमेश कुशवाह यांनी २०१६ मध्ये एका हत्येप्रकरणात स्थानिक न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध खटला अद्याप प्रलंबित आहे. तरीही त्यांनी आपली पत्नी विजयलक्ष्मी देवी यांच्यासाठी सिवानमधून उमेदवारी मिळविली आहे.

टॅग्स :bihar lok sabha election 2024बिहार लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJanta Dal Unitedजनता दल युनायटेड