भारत-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान कुत्र्यावरून झाले भांडण, एकाचा खून

By Admin | Updated: March 28, 2016 10:34 IST2016-03-28T10:34:33+5:302016-03-28T10:34:57+5:30

मॅच पाहताना कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादानंतर त्या कुत्र्याच्या मालकाने २० वर्षांच्या मुलाची खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री बंगळुरूत घडली.

A dog was murdered during India-Australia match; | भारत-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान कुत्र्यावरून झाले भांडण, एकाचा खून

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान कुत्र्यावरून झाले भांडण, एकाचा खून

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २८ - रविवारी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या रंजक सामन्याचा सर्वांनीच आनंद लुटला, मात्र हीच मॅच पाहणे बंगळुरूत एका तरूणाच्या जीवावावर बेतली. मॅच पाहताना कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादानंतर त्या कुत्र्याच्या मालकाने २० वर्षांच्या मुलाची खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री बंगळुरूमध्ये घडली. अविनाश असे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव असून जॉन केनेडी असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी काही तरूण सेंट्रल बंगळुरूमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहत होते, त्याचवेळी जॉन त्याच्या कुत्र्याला घेऊन तेथे आला. मात्र थोड्याच वेळात त्याचा कुत्रा भुंकू लागल्याने त्या तरूणांनी जॉनला तेथून निघून जाण्यास सांगितले. 
या घटनेमुळे रागावलेला जॉन तेथून निघाला तर खरा पण थोड्याच वेळात तो त्याच्या इतर मित्रांना घेऊन पुन्हा तेथे आला आणि त्याने २० वर्षांच्या अनिनाशच्या पोटात दारूची बाटली खुपसली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अविनाशला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी जॉनला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.

Web Title: A dog was murdered during India-Australia match;