शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्याची दहशत! 2 तासांत 40 जणांवर केला हल्ला; रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्ड फुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 16:08 IST

दोन तासांत भटक्या कुत्र्याने चावा घेऊन 40 जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राजस्थानच्या बाडमेरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक कुत्रा चावण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता कल्याणपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तासांत भटक्या कुत्र्याने चावा घेऊन 40 जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या सर्व जखमींना उपचारासाठी मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आलं. एवढ्य़ा मोठ्या संख्येने लोक उपचारासाठी दाखल झाल्याने इमर्जन्सी वॉर्ड देखील भरला आहे. 

कुत्र्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणपुरा येथील मानक हॉस्पिटलजवळ एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकामागून एक 40 जणांना चावा घेऊन जखमी केलं. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात आणलं असता व्यवस्थापनही हैराण झालं. त्यानंतर या घटनेची माहिती नगर परिषदेला देण्यात आली आणि कुत्र्याला पकडण्यासाठी दोन पथकं तयार करण्यात आली. 

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने भटक्या कुत्र्याला पकडण्यात आलं. नगर परिषदेने आता शहरातील विविध भागातील भटकी कुत्री पकडण्याची योजना तयार केली आहे. अचानक भटक्या कुत्र्याने चावलेल्या अनेक जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बीएल मन्सूरिया यांनी सांगितलं .

पिसाळलेला कुत्रा शहरातील अनेक भागात फिरतोय आणि त्याने शहरात विविध ठिकाणी अनेक जणांना चावून जखमी केलं आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. याबाबत नगर परिषदेला अनेकदा सांगण्यात आले, मात्र कुत्र्याला पकडण्याबद्दल कारवाई झाली नाही, त्यामुळे ही मोठी घटना घडली, असं नागरिकांनी म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थानdogकुत्रा