शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
5
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
6
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
7
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांचा जागतिक स्तरावर डंका
8
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
9
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
10
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
11
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
12
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
13
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
14
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
16
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
17
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
18
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
19
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
20
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 

Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:16 IST

एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक संतापले आहेत, शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून त्यांनी उच्छाद मांडल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक संतापले आहेत, शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून त्यांनी उच्छाद मांडल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक लहान मुलगा स्त्यावर खेळत होता. तेव्हा अचानक एक भटका कुत्रा तिथे आला आणि त्याने अचानक मुलावर हल्ला केला. 

कुत्र्याने मुलाला जमिनीवर पाडलं, त्याचे लचके तोडले. मुलगा घाबरून मोठमोठ्याने ओरडू लागला, परंतु त्यावेळी जवळ कोणीही मोठी व्यक्ती नव्हती जी लगेचच त्याला मदत करू शकेल. सुदैवाने त्याच वेळी दोन जण बाईकवरून तेथून जात होते. त्यांनी ही घटना पाहिली आणि लगेच त्यांची बाईक थांबवली आणि मुलाकडे धावले. दोघांनी मिळून कुत्र्याचा पाठलाग केला आणि मुलाला त्याच्या तावडीतून सोडवलं. यामुळे मुलाचा जीव वाचला.

तरुण वेळीच आले नसते तर मुलासोबत भयंकर घडलं असतं. या हल्ल्यात मुलाला दुखापत झाली आहे आणि त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मुलाला धोका नाही. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक महानगरपालिका आणि प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि ते दररोज रस्त्यावरून जाणाऱ्यांवर, विशेषतः मुलांवर हल्ला करत आहेत. जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. 

टॅग्स :dogकुत्राUttar Pradeshउत्तर प्रदेशSocial Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओ